चिमुकल्यांनी मतदानातून केली ‘मॉनिटर’ची निवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:54 PM2017-09-23T12:54:37+5:302017-09-23T12:56:59+5:30

करवडी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजेच ‘मॉनिटर’ची निवड करण्यासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी चिमुकल्यांनी मतदान करून आपल्या पसंतीचा प्रतिनिधी निवडला. शाळेच्या या अनोख्या उपक्रमाचे विभागातून कौतुक करण्यात आले.

Chimukkale voted 'monitor' choice! | चिमुकल्यांनी मतदानातून केली ‘मॉनिटर’ची निवड!

चिमुकल्यांनी मतदानातून केली ‘मॉनिटर’ची निवड!

Next
ठळक मुद्देकरवडी येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रम शाळेत घेतले प्रत्यक्ष मतदान; विद्यार्थ्यांमध्ये उत्साहदिपक, शिवांजली विजयीमतदान केंद्राची प्रतिकृती तयार करून मतदान

ओगलेवाडी : करवडी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजेच ‘मॉनिटर’ची निवड करण्यासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी चिमुकल्यांनी मतदान करून आपल्या पसंतीचा प्रतिनिधी निवडला. शाळेच्या या अनोख्या उपक्रमाचे विभागातून कौतुक करण्यात आले.

मतदान अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, मतदान कक्ष, मतपेटी, आचारसंहीता, उमेदवार व मतदार या सर्व लवाजम्यासह करवडी शाळेत मतदान पार पडले. विद्यार्थी प्रतिनिधीची निवड करताना या शाळेने प्रत्यक्ष मतदान प्रक्रीया राबवून वेगळा आदर्श निर्माण केला. शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.

या निवडणूकीची तयारी शाळेत गत दहा ते बारा दिवसापासून चालू होती. इच्छूक उमेदवारांची नावे घेणे,  मतदान प्रतिनिधी, उमेदवारांचे कार्यकर्ते, प्रचार, आचारसंहिता, चिन्हांचे वाटप अशा निवडणूकीसंदर्भात सर्व गोष्टी मुलांना समजून सांगण्यात आल्या. मुलांनी मतदान पत्रिका स्वत: बनवल्या. मतपत्रिकेवर शिक्का कसा मारावा, हेही मूलांना समजावून सांगण्यात आले. सर्व तयारी झाल्यानंतर निवडणूकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम पार पडला.

मतदान केंद्राची प्रतिकृती तयार करून मतदान घेण्यात आले. यावेळी मुले खूप उत्साहात असल्याचे जाणवले. सर्व मुले मतदार असल्याने शिक्षक मतदान अधिकारी झाले होते. यावेळी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केंद्रप्रमुख सोनावणे, क्षेत्रीय अधिकारी म्हणून विजया पाटील, केंद्राध्यक्ष म्हणून संगिता यादव, मतदान अधिकारी म्हणून रिजवाना मूल्ला, उज्वला पवार, वैशाली माने, उदय भंडारे यांनी काम पाहिले. पोलिस कर्मचारी म्हणून प्रियांका शिवदास, मतमोजणी अधिकारी म्हणून रविंद्र ताटे, संदीप पाटोळे, यांनी काम पाहिले. 

मुलांची मदत घेवून यावेळी मतदान बुथ तयार करण्यात आले होते. मतदानासाठी मुलांच्या रांगा लागल्या होत्या. सर्व मुलांनी ओळखपत्र म्हणून आधारकार्ड आणली होती. प्रथम अधिकाºयाने मतदाराचे  नाव वाचणे, ओळख पटवणे, दुसºया अधिकाºयाने ओळखपत्र पाहणे, मतदाराची स्वाक्षरी घेणे, तिसºया अधिकाºयाने शाई लावणे, त्यानंतर मतपत्रिका घेऊन विद्यार्थी मतदार बुथमध्ये जात होते. 

दिपक, शिवांजली विजयी


आपल्या पंसतीच्या उमेदवाराच्या चिन्हावर शिक्का मारण्यासाठी शाळेचा शिक्का आणि पॅड ठेवले होते. त्यानंतर मतपत्रिकेची घडी करून मतदान पेटीमध्ये टाकले जात होते. मतमोजणीची एक-एक फेरी होईल तशी मुलांची उत्सुकता वाढत होती. अखेर दिपक पवार हा विद्यार्थी ११३ मतांनी तर शिवांजली पवार ही विद्यार्थिनी १०५ मतांनी निवडून आली.

Web Title: Chimukkale voted 'monitor' choice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.