अंगणवाडीच्या लेकरांनाही इंग्रजी शाळांचाच लळा...मराठी भाषेवर कमी प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:46 PM2018-06-22T22:46:00+5:302018-06-22T22:48:29+5:30

दिवसेंदिवस ग्रामीण भागात वाढत जाणारे इंग्रजी शाळांचे प्रस्त जणू मराठीचे अस्तित्वच धोक्यात आणणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असून, सध्या तरी परिसरातील इंग्रजी शाळांनी अंगणवाडीच्या

 The children of Anganwadi also take English school ... less love for Marathi language | अंगणवाडीच्या लेकरांनाही इंग्रजी शाळांचाच लळा...मराठी भाषेवर कमी प्रेम

अंगणवाडीच्या लेकरांनाही इंग्रजी शाळांचाच लळा...मराठी भाषेवर कमी प्रेम

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामीण भागाला नव्या लाईफस्टाईलची भुरळ

संतोष धुमाळ ।
पिंपोडे बुद्रुक : दिवसेंदिवस ग्रामीण भागात वाढत जाणारे इंग्रजी शाळांचे प्रस्त जणू मराठीचे अस्तित्वच धोक्यात आणणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असून, सध्या तरी परिसरातील इंग्रजी शाळांनी अंगणवाडीच्या पटाचे गणितच चुकविल्याचे दिसून येत आहे.सध्या शिक्षणाचा बाजार झाला आहे. शासनाने पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण मोफत केले आहे. मात्र, पालक हे आपली पाल्य मराठी शाळेत न घालता इंग्रजी भाषेच्या शाळेत घालत आहेत. या मागील कारण असे की, आपला मुलगा हा स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे, असा हेतू असतो; मात्र पालकांनी आपला मुलगा हा मराठी शाळेत पाठवले तर मराठी भाषेचे महत्त्व कळले.

इंग्रजी भाषेचा वाढता वापर, वाढती स्पर्धा व काही क्षेत्रांत होणारी इंग्रजीची सक्ती आदीमुळे ग्रामीण भागातील पालकांना देखील इंग्रजीची भुरळ पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे वाढत आहे.त्याचा नेमका परिणाम परिसरातील अंगणवाडीतील मुलांची संख्या कमी होऊन इंग्रजी माध्यमातील पट संख्या मात्र रोडावत आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील बहुतांशी अंगणवाड्या पुरेशा पटसंख्येअभावी बंद पडतील की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

शासनाच्या बालकल्याण विभागाच्या नियंत्रणाखाली चालविणाऱ्या जाणाºया अंगणवाडीत बालकांच्या शारीरिक वाढीसाठी पोषक आहार तसेच बालकांच्या सर्वसमावेशक विकास वाढीसाठी नि:शुल्क विविध उपक्रम राबविले जात असताना केवळ इंग्रजी माध्यमासाठी पालकांकडून अंगणवाड्यांकडे दुर्लक्ष करून मासिक फी, वाहतूक खर्च करण्यासाठी पदरमोड करून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पसंती दिली जात आहे.
 

आपल्या पाल्यासाठी इंग्रजी वा मराठी माध्यमाची निवड करणे हे जरी पालकांच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित असले तरी सर्वसामान्यासांठी शासनाने सुरू केलेल्या आंगणवाड्या वा मराठी शाळा टिकविण्यासाठी देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे.
-राजश्री पवार, अंगणवाडी सेविका

अगदी पहिली पासून मुलांना इंग्रजी शाळांत पाठविले असता मुलांचा पाया चांगला होत आसल्याचा पालकांचा समज असला तरी केवळ मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन उच्च पदे भूषविणाºयांची संख्या कमी नाही. मुलांना शिकवून उच्च पदावर पोहचवूनआर्दश निर्माण करु
- संजय धुमाळ, अध्यक्ष

Web Title:  The children of Anganwadi also take English school ... less love for Marathi language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.