माजी सैनिकाचं घराचं स्वप्न राहिलं अधुरं, रहिमतपूरचे चंद्रशेखर जंगम यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 06:01 PM2018-03-20T18:01:57+5:302018-03-20T18:01:57+5:30

पाकिस्तानला १९६५ च्या युद्धात चारिमुंड्या चित करणारे रहिमतपूर येथील सुभेदार चंद्रशेखर जंगम यांना साताऱ्यांत मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार होती. जागेची मूल्यांकन रक्कम पन्नास वर्षांपूर्वी भरूनही त्यांना जागेचा ताबा मिळाला नाही. घरासाठी पन्नास वर्षे लढा देणारे चंद्रशेखर जंगम यांचे साताऱ्यांत सोमवारी रात्री निधन झाले. त्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले.

Chandrasekhar Jangam passed away in the dream of former soldier's house | माजी सैनिकाचं घराचं स्वप्न राहिलं अधुरं, रहिमतपूरचे चंद्रशेखर जंगम यांचे निधन

माजी सैनिकाचं घराचं स्वप्न राहिलं अधुरं, रहिमतपूरचे चंद्रशेखर जंगम यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देमाजी सैनिकाचं घराचं स्वप्न राहिलं अधुरंरहिमतपूरचे चंद्रशेखर जंगम यांचे निधन वयाच्या शंभराव्या वर्षी साताऱ्यात घेतला अखेरचा श्वास

सातारा/रहिमतपूर : पाकिस्तानला १९६५ च्या युद्धात चारिमुंड्या चित करणारे रहिमतपूर येथील सुभेदार चंद्रशेखर जंगम यांना साताऱ्यांत मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार होती. जागेची मूल्यांकन रक्कम पन्नास वर्षांपूर्वी भरूनही त्यांना जागेचा ताबा मिळाला नाही. घरासाठी पन्नास वर्षे लढा देणारे चंद्रशेखर जंगम यांचे साताऱ्यांत सोमवारी रात्री निधन झाले. त्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले.

निवृत्त सुभेदार चंद्रशेखर मल्लिकार्जुन जंगम गेल्या ५० वर्षांपासून न्यायासाठी लढा देत होते. साताऱ्यातील तत्कालीन शासकीय धोरणानुसार जमिनीचे मूल्यांकन भरूनही केवळ लालफितीच्या भोंगळ कारभारामुळे जमिनीचा ताबा मिळत नाही. पाकिस्तानविरुद्धच्या लढाईतला नायक लालफितीच्या कारभारापुढे हतबल झाला होता.

जंगम हे भारतीय सैन्यदलातून १९७१ मध्ये सेवानिवृत्त झाले. तत्कालीन शासकीय धोरणानुसार सेवानिवृत्त सैनिकांना योग्य मोबदल्यात जमिनी देण्यात येत होत्या. त्यानुसार २६ नोव्हेंबर, १९६४ रोजी साताऱ्याचे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे जंगम यांनी जमीन मिळण्याबाबत अर्ज केला होता.

अर्जाच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी क्रमांक सीटीएस २२.०७ या आदेशाच्या संदर्भाने तत्कालीन नगरभूमापन नगररचनाकार सातारा यांच्याकडून मूल्यांकन करून घेत रविवार पेठ, १६६/अ,१ या शासकीय जागा मंजूर केली.

जमिनीच्या कब्जाहक्काची रक्कम भरण्याबाबत २० सप्टेंबर १९६८ रोजी जंगम यांना पत्राद्वारे कळवले. त्याप्रमाणे ११ आॅक्टोबर १९६८ रोजी शासकीय चलन क्रमांक २७ ने शासकीय कोषागारात जंगम यांनी मंजूर प्लॉंटची रक्कम रुपये ३ हजार ६४७ रुपये भरली.

जंगम यांना ही जागा मंजूर झाल्याचे व तिची कब्जा हक्काची रक्कम शासकीय कोषागारात भरल्याबाबतचे स्वयंस्पष्ट पत्र तत्कालीन नगरभूमापन अधिकारी, सातारा यांनी २१ एप्रिल १९६९ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी, सातारा यांना दिले होते.

तरीही जंगम यांना मान्य मंजूर केलेल्या भूखंड नियमबाह्य पद्धतीने फाळणी प्रक्रिया न करता सीटीसर्व्हे नंबर १६६ अ/१ या जागेपैकी १५२५ चौरस फूट एवढी जागा भागीरथीबाई रघुनाथ बल्लाळ यांना दिली.

ही फसवणूक केली गेली असतानाच १९९७ मध्ये सातारा नगरपरिषद सातारा यांना आरक्षणांतर्गत उर्वरित जागा २ एप्रिल २००८ च्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तांतरित केली. याबाबतची सर्व माहिती व कागदपत्रे जंगम यांना माहिती अधिकारात प्रशासनाकडून प्राप्त झाली होती.

याबाबत २०१७ च्या विधिमंडळ अधिवेशनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यानंतर पुन्हा हिवाळी अधिवेशनात आमदार जयकुमार गोरे यांनीही तारांकित प्रश्न उपस्थित करून जंगम यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत वाचा फोडली होती. घराचे स्वप्न उराशी बाळगूळ पन्नास वर्षे प्रशासकीय लढा दिलेले माजी सैनिक चंद्रशेखर जंगम यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

ब्रह्मपुरीत अंत्यसंस्कार

माजी सैनिक जंगम यांच्यावर मंगळवारी श्रीक्षेत्र ब्रम्हपुरी येथे वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होत.

Web Title: Chandrasekhar Jangam passed away in the dream of former soldier's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.