कोयनेसह बलकवडी, मोरणा धरणातून विसर्ग, पावसाची संततधार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:28 PM2018-07-18T13:28:36+5:302018-07-18T13:31:56+5:30

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी कायम असून, आता कोयना धरणासह बलकवडी आणि मोरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयनेतून सध्या ९५४१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे पाटण तालुक्यात घरांची पडझड सुरू झाली आहे.

Bankawadi with Koyanee, Motha dam, Virgo and continuous rain | कोयनेसह बलकवडी, मोरणा धरणातून विसर्ग, पावसाची संततधार कायम

कोयनेसह बलकवडी, मोरणा धरणातून विसर्ग, पावसाची संततधार कायम

Next
ठळक मुद्देकोयनेसह बलकवडी, मोरणा धरणातून विसर्ग, पावसाची संततधार कायम घरांची पडझड सुरू; धरणसाठा झपाट्याने वाढू लागला

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी कायम असून, आता कोयना धरणासह बलकवडी आणि मोरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयनेतून सध्या ९५४१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे पाटण तालुक्यात घरांची पडझड सुरू झाली आहे.

गेल्या १८ दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कोसळत आहे. या पावसाचा जोर कायम असल्याने ओढे, नाले खळाळू लागले आहेत. बुधवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरणात ७९.८६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

यंदा गतवर्षीपेक्षा लवकरच धरण भरणार आहे. तर मंगळवारपासून कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पायथा वीजगृह आणि दरवाजातून पाणी सोडण्यात आले आहे. तर बुधवारी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला.

पायथा गृहातून २१०० आणि दरवाजातून ७४४१ असा ९५४१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तर बलकवडी धरणातूनही पाणी सोडण्यात आले आहे. १४३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. मोरणा धरणातूनही ३५१० क्युसेक पाणी विसर्ग सुरू झाला आहे.

 जिल्ह्यातील इतर धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. बलकवडी येथे ८३, उरमोडी ६२ आणि तारळी धरण परिसरात १०२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धोम धरणात ८.२८ टीएमसी, कण्हेर ७.५७, बलकवडी ३.५६, उरमोडी ७.२२ तर तारळी धरणात ४.७१ टीमएसी इतका साठा झाला आहे.


धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये

धोम १४ (४५२)
कोयना १३५ (२९२४)
बलकवडी ८३ (१५६३)
कण्हेर ३१ (५१६)
उरमोडी ६२ (७३९)
तारळी १०२ (१३७६)


साताऱ्यात ऊन पावसाचा खेळ...

सातारा शहर आणि परिसरात गेल्या १७ दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. बुधवारी सकाळी पावसाने काहीकाळ उघडीप दिली होती. त्यामुळे ऊन पडले होते. त्यानंतर पाऊस पडू लागला.

Web Title: Bankawadi with Koyanee, Motha dam, Virgo and continuous rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.