बेवारस अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांची पटली ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:43 AM2019-03-11T10:43:37+5:302019-03-11T10:45:23+5:30

नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने नाईलाजास्त पोलिसांना अखेर संबंधित मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करावे लागले. मात्र, चौदाव्या दिवशी नातेवाईकांची ओळख पटली. सख्या भावावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार झाल्याने झोरे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.

After being cremated, his confession came | बेवारस अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांची पटली ओळख

बेवारस अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांची पटली ओळख

Next
ठळक मुद्देबेवारस अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांची पटली ओळखसाताऱ्यातील घटना; झोरे कुटंबीय शोकसागरात बुडाले

सातारा: नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने नाईलाजास्त पोलिसांना अखेर संबंधित मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करावे लागले. मात्र, चौदाव्या दिवशी नातेवाईकांची ओळख पटली. सख्या भावावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार झाल्याने झोरे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात २४ फेब्रुवारी रोजी ४५ वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. उपचारादरम्यान संबंधित व्यक्ती शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी आपले नाव उत्तम विठोबा झोरे (रा. सिंदगी, जि. विजापूर) असे सांगितले. मात्र, त्यानंतर दुसऱ्या दिवशी झोरे यांचा उपचारादरम्यान सिव्हिलमध्ये मृत्यू झाला.

पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरूवात केली. मृत्यूपूर्वी झोरे यांनी कर्नाटकातील विजापूर येथील पत्ता सांगितला होता. त्या पत्त्यावर जाऊनही पोलिसांनी चौकशी केली. मात्र, नातेवाईक काही सापडत नव्हते.

झोरे यांचा मृत्यू होऊन पाच ते सहा दिवस झाले होते. त्यामुळे शवागृहात दुर्गंधी पसरली होती. नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने अखेर पोलिसांनी झोरे यांच्यावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मृतदेह दफन करण्यात आला. त्यांच्याजवळ असलेली बॅग आणि अन्य साहित्य पोलिसांनी आपल्याजवळ ठेवून घेतले.

दरम्यान, तब्बल चौदा दिवसांनंतर झोरे यांचा भाऊ, भाचा हे जिल्हा शासकीय रुग्णालयात आले. यावेळी त्यांनी भावाची बॅग आणि पोलिसांजवळील फोटो पाहून हे उत्तम झोरेच असल्याचे सांगितले. मात्र, ओळख पटूनही त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांच्यावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार झाल्याने झोरे कुटुंबीयांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

साताऱ्यातील मंगळवार पेठ आणि शाहूपुरी परिसरात झोरे कुटुंबीय वास्तव्यास आहे. एवढ्या जवळ असतानाही आपण त्यांना शेवटचे पाहू शकलो नाही, याची खंत मनात घेऊन जड पावलांनी झोरे कुटुंबीय सिव्हिलमधून घरी निघून गेले. जाताना मात्र, त्यांनी मृत झोरे यांची बॅग आठवण म्हणून घरी नेली.

Web Title: After being cremated, his confession came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.