सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये ९० टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:48 PM2018-07-15T22:48:51+5:302018-07-15T22:49:26+5:30

90 TMC water storage in dams in Satara district | सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये ९० टीएमसी पाणीसाठा

सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये ९० टीएमसी पाणीसाठा

Next


सातारा : जिल्ह्याच्या पश्मि भागात १५ दिवसांपासून संततधार कायम असल्याने धरणांतील साठा झपाट्याने वाढू लागला आहे. जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणे परिसरात गतवर्षीपेक्षा अधिक १७०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे या सर्व धरणांमध्ये सध्या ९० टीएमसी साठा झाला आहे. गेल्यावर्षी तो ६० टीएमसी इतका होता. तर यावर्षी ५७६६ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.
गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कोसळत आहे. या पावसाचा जोर कायम असल्याने ओढे, नाले खळाळू लागले आहेत. तर भात लागणीच्या कामाला वेग आला आहे. बुधवारी रात्रीपासून तर पावसाचा जोर आणखी वाढला आहे. सततच्या या पावसामुळे पश्चिम भागात गेल्या १५ दिवसांत सूर्यदर्शन झालेच नाही. लोकांनाही घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. पावसाची अशीच संततधार सुरू राहिल्यास पश्चिम भागातील सर्व धरणे गतवर्षीपेक्षा लवकर भरतील, अशी स्थिती आहे.
यावर्षी वेळेत पाऊस सुरू झाल्याने पावसाने गतवर्षीची आकडेवारी ओलांडली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा अधिक पाऊस झाला आहे. गतवर्षी १५ जुलैपर्यंत धरण परिसरात ४०३७ मिलीमीटर पाऊस झाला होता. तर यंदा तो ५७६६ मिलीमीटरपर्यंत पोहोचला आहे. या पावसामुळे धरणातील साठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गतवर्षी प्रमुख सहा धरणात ६०.०६ तर आता ८८.०३ टीएमसी इतका साठा आहे. हा साठा गतवर्षीपेक्षा जवळपास ३० टीएमसीने अधिक आहे.
सातारा शहरातही सतत पाऊस...
रविवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरणात ६४.९२ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ३८ हजार २६५ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. यंदा गतवर्षीपेक्षा लवकरच धरणात ६० टक्के साठा निर्माण झाला आहे. तर जिल्ह्यातील इतर धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. बलकवडी येथे ६६, उरमोडी ३१ आणि तारळी धरण परिसरात ८९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच सातारा शहरातही जोरदार पाऊस होत असून, सर्वत्र पाणी पाणी होत आहे.
धरण परिसरातील यावर्षीचा एकूण पाऊस,
साठा आणि गेल्यावर्षीचा पाऊस व साठा
(सर्व माहिती मिलीमीटर आणि टीएमसीमध्ये)
यावर्षी गतवर्षी
धोम ३७५ मिमी ६.१४ टीएमसी २६१ मिमी ४.३८ टीएमसी
कण्हेर ३८० ५.३८ २५४ ३.६४
कोयना २३६० ६४.९२ १७३९ ४२.४३
बलकवडी ११२५ २.५५ ९२५ १.७५
उरमोडी ५३० ५.८० ४०० ५.३५
तारळी १००६ ३.२४ ४५८ २.५१
 

Web Title: 90 TMC water storage in dams in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.