विधानसभेसाठी राष्ट्रवादीतून सातारा  जिल्ह्यात १३ जण इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 01:13 PM2019-07-06T13:13:27+5:302019-07-06T13:16:29+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी साताºयातील आठ मतदार संघांतून १३ जण इच्छुक आहेत. या सर्वांनी प्रदेश कार्यालयाकडे आपले अर्ज दाखल केले आहेत.

13 people wanted in the Satara district for the Assembly elections from the NCP | विधानसभेसाठी राष्ट्रवादीतून सातारा  जिल्ह्यात १३ जण इच्छुक

विधानसभेसाठी राष्ट्रवादीतून सातारा  जिल्ह्यात १३ जण इच्छुक

Next
ठळक मुद्दे प्रदेशाध्यक्षांकडे मागणी : इच्छुकांची संख्या मोठी

सातारा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी साताºयातील आठ मतदार संघांतून १३ जण इच्छुक आहेत. या सर्वांनी प्रदेश कार्यालयाकडे आपले अर्ज दाखल केले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मागवले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून प्रदेश कार्यालयाकडे ई मेलद्वारे तसेच जिल्हा कार्यालयांमार्फत हे अर्ज दाखल करण्यात आले. 
माण-खटाव तालुक्यातून सर्वात जास्त इच्छुक आहेत. येथून प्रभाकर देशमुख, प्रा. कविता म्हेत्रे, नंदकुमार मोरे, संदीप मांडवे, सूर्यकांत राऊत, कºहाड दक्षिणमधून अ‍ॅड. राजाभाऊ पाटील-उंडाळकर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अमित पाटील, फलटणमधून विद्यमान आमदार दीपक चव्हाण, प्रा. अनिल जगताप यांनी अर्ज सादर केले आहेत. सातारा-जावळीतून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघातून विद्यमान आमदार मकरंद पाटील, कोरेगावातून शशिकांत शिंदे, पाटणमधून सत्यजित पाटणकर, कºहाड उत्तरमधून आमदार बाळासाहेब पाटील यांची नावे प्रदेश कार्यालयाकडून अंतिम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत प्रदेश कार्यालयाने वाढवली आहे. ८ जुलै रोजी या अर्जांची छाननी होणार असून, १५ जुलैपर्यंत मुंबईत पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार, नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. अजित पवार यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. 

Web Title: 13 people wanted in the Satara district for the Assembly elections from the NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.