योग्य शिक्षणाअभावी हा तरुणवर्ग देशासाठी बॉम्बच ठरणार : अतुल कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 01:05 AM2018-12-18T01:05:56+5:302018-12-18T01:06:58+5:30

भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी, योग्य शिक्षणाअभावी हा तरुणवर्ग देशासाठी बॉम्बच ठरणार आहे. जगभरातील प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत.

This young boy will be a bomb blast for lack of proper education: Atul Kulkarni | योग्य शिक्षणाअभावी हा तरुणवर्ग देशासाठी बॉम्बच ठरणार : अतुल कुलकर्णी

सांगलीत सोमवारी क्रेडाईतर्फे आयोजित ‘ड्रीम होम २०१८’ प्रदर्शनात अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

Next
ठळक मुद्देसांगलीत ‘क्रेडाई’च्या कार्यक्रमास प्रतिसाद

सांगली : भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी, योग्य शिक्षणाअभावी हा तरुणवर्ग देशासाठी बॉम्बच ठरणार आहे. जगभरातील प्रत्येक क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत. हे बदल मान्य करावेच लागणार आहेत. त्यामुळे ‘जुनं ते सोनं’ ही म्हण विसरून नव्याने येणाऱ्या आव्हानांचा स्वीकार करण्याची मानसिकता ठेवा, असे आवाहन अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोमवारी सांगलीत केले.

‘क्रेडाई’ सांगलीच्यावतीने येथील कल्पद्रुम मैदानावर आयोजित ‘ड्रीम होम २०१८’ या वास्तुविषयक प्रदर्शनात ‘सांगली ब्रॅँडिंग, नवोदित उद्योजकांसमोरील आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. के्रडाईचे अध्यक्ष विकास लागू यांच्यासह उपस्थित सांगलीकरांनीही त्यांना विविध विषयांवरील प्रश्न विचारून मत जाणून घेतले.
कुलकर्णी म्हणाले, भारत हा तरुणांचा देश असला तरी, स्वत:ची विचारप्रक्रिया तयार व्हावी, ज्याव्दारे निर्णयक्षमता वाढविणाºया शिक्षणाची खरी गरज आहे. मात्र, ते मिळत नसल्याने तरुण म्हणजे बॉम्बच ठरणार आहेत.

माझ्याकडे काय आहे, यापेक्षा माझ्याबरोबर असलेल्या लोकांकडे काय आहे, हे पाहण्याची मानसिकता वाढत आहे. संपत्ती मिळविण्यापेक्षा लोकांना दिसणारी संपत्ती असावी, याकडे ओढा वाढत आहे. आपले सुख कशात हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. पूर्वीही बदल होत गेले, मात्र आता त्याचा वेग वाढलेला आहे. पैसा हे साधन असताना, ते आता साध्य बनले आहे.

ते म्हणाले की, आता अनेकांच्या असलेल्या नोकºया, व्यवसाय येत्या २० वर्षांत असणार नाहीत. आजची शिक्षण पध्दतीही भविष्यात निकामी ठरणार आहे. एका व्यक्तीला तीन ते चार व्यवसाय करावे लागणार आहेत. यातून निर्माण होणारा ताण कसा कमी करायचा, हेच त्यावेळचे आव्हान असणार आहे. भविष्याचा वेध घेणाºया नोकरी, व्यवसायाची आज समाजाला सर्वाधिक गरज आहे.यावेळी क्रेडाईचे उपाध्यक्ष रवींद्र खिलारे व पदाधिकारी उपस्थित होते.

अभिनय व्यवसाय बेभरवशाचा
कुलकर्णी म्हणाले, प्रत्येक व्यवसायात ‘बॅड पॅच’ असतोच. त्यावर मात कशी करायची, हे तंत्र समजणे आवश्यक आहे. बिल्डर्सही आता याविषयी बोलू लागले असले तरी सर्वाधिक बेभरवशाचा व्यवसाय अभिनयाचा आहे. शेतकरी आणि अभिनेता या दोघांचीही स्थिती सारखीच आहे. कष्ट करून पिकविलेल्या शेतीमालाचा भाव पडतो, तसाच वर्षभर मेहनत घेऊन तयार केलेला एखादा चित्रपट प्रेक्षकांना आवडला नाही तर त्याचा अभिनेत्यांना फटका बसतो.

 

Web Title: This young boy will be a bomb blast for lack of proper education: Atul Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.