Yogi Adityanath in January, Amit Shah on Tasgaon Tour | जानेवारीत योगी आदित्यनाथ, अमित शहा तासगाव दौऱ्यावर
जानेवारीत योगी आदित्यनाथ, अमित शहा तासगाव दौऱ्यावर

ठळक मुद्देसंजयकाका पाटील : मांजर्डे येथे ग्रामस्थांसमवेत आढावा बैठक

मांजर्डे : तासगाव येथील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.

मांजर्डे (ता. तासगाव) येथे संजयकाका पाटील यांनी पेड जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आढावा बैठक घेतली होती, यावेळी ते बोलत होते.संजयकाका पाटील म्हणाले, एकमेकावर टीका करण्यापेक्षा आपण आपल्या कामाकडे लक्ष देऊ. कामाचे श्रेय कोणीही घेऊ दे. जनता योग्य हिशेब करेल. टेंभू उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पुढील आठ ते नऊ महिन्यात सर्व कामे पूर्ण करणार आहे.

जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे यांनी मराठा आरक्षणाबद्दल सरकारचे अभिनंदन केले. तसेच धनगर आरक्षण तात्काळ देण्याची मागणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे, सचिन पाटील, सुदीप खराडे, मोहन पाटील, शिवा मोहिते, सचिन हजारे, दिलीप मदने उपस्थित होते.

ग्रामस्थांनी मांडल्या समस्या
भाजप सरकारच्या काळात केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्गांसह अंतर्गत रस्ते, पाणी या कामांना प्राधान्य दिले आहे. बैठकीत ग्रामस्थांनी आपापल्या गावांतील समस्या मांडल्या.

मांजर्डे (ता. तासगाव) येथे आयोजित ग्रामस्थांच्या बैठकीत संजयकाका पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेंडगे, सचिन पाटील उपस्थित होते.


Web Title: Yogi Adityanath in January, Amit Shah on Tasgaon Tour
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.