चांदोली धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार का? दोन वर्षापासून अधिकारीच फिरकले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:54 PM2019-07-04T23:54:48+5:302019-07-04T23:55:51+5:30

चांदोली धरण महाराष्ट्रातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण असून ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. पण, धरण प्रशासनाचे अधिकारी गेल्या दोन वर्षांत इकडे फिरकलेच नाहीत. सहा महिन्यांपासून धरणाच्या भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.

Will the structural audit of the Chandoli dam be done? | चांदोली धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार का? दोन वर्षापासून अधिकारीच फिरकले नाहीत

चांदोली धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार का? दोन वर्षापासून अधिकारीच फिरकले नाहीत

googlenewsNext
ठळक मुद्देसहा महिन्यांपासून भिंतीवरील पथदिवे बंद : सीसीटीव्ही कॅमेरे बंद

गंगाराम पाटील ।
वारणावती : चांदोली धरण महाराष्ट्रातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण असून ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. पण, धरण प्रशासनाचे अधिकारी गेल्या दोन वर्षांत इकडे फिरकलेच नाहीत. सहा महिन्यांपासून धरणाच्या भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे कोणत्याहीक्षणी धरणाला धोका पोहोचू शकतो. धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाची निर्मिती १९७६ मध्ये झाली. प्रथम १९८४ मध्ये अंशत: पाणीसाठा करण्यात आला, तर १९९२ पासून हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास सुरुवात झाली. याच धरणाच्या पायथ्याशी १६ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प आहे. सिंचनासह वीजनिर्मिती होते. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या ३६७.१७ चौरस किलोमीटरच्या पाणलोट क्षेत्रातून चांदोली धरणात पाण्याची आवक होत असल्याने हा परिसर पावसाचे आगर समजला जातो.

कोकणचे प्रवेशद्वार असणाºया या परिसरात पावसाळ्यात धुवाधार पाऊस, वारा व वारंवार होणाºया भूकंपामुळे हा परिसर संवेदनशील क्षेत्र आहे. पण धरण व पाणी याचे प्रशासन जलसंपदा विभागाकडे, तर वसाहत देखभाल व दुरुस्ती, वीज, पाणी हे कृष्णा खोरे विकास महामंडळ प्रशासनाकडे आहे. धरणाची सुरक्षा पोलीस यंत्रणेकडे व वीजनिर्मिती विद्युत पारेषण कंपनीकडे आहे. धरणाची अशी चार विभागांकडे विभागणी झाली आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रशासनाचा जबाबदार अधिकारी नाही. प्रत्येकजण आपापली जबाबदारी टाळताना दिसत आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून धरणाच्या भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.

वारंवार तक्रारी करूनही धरण प्रशासनाने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून हे धरण पूर्णपणे अंधारात आहे. त्यामुळे धरणाला कोणत्याही क्षणी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी, सोनवडे, चरण, कोकरुड परिसरातील शेतकºयांनी केली आहे.

धरणाला कोणताही धोका नाही
धरणाच्या धोक्याविषयी शाखाधिकारी प्रदीप कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, चांदोली धरण हे राज्यातील मातीचे दुसºया क्रमांकाचे धरण आहे. नाशिक येथील कार्यकारी अभियंत्यांकडून देखभाल, दुरुस्ती केली जाते. वर्षातून दोनवेळा त्याची पाहणी केली जाते. त्याचा अहवाल दिला जातो. धरण मजबूत असून धरणाला कोणताही धोका नाही.

Web Title: Will the structural audit of the Chandoli dam be done?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.