सांगलीत वाहन परवान्यांसाठी ‘वेटिंग’११ हजारांवर, कार्यालयात वाहनधारकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:08 PM2018-02-17T13:08:08+5:302018-02-17T13:16:29+5:30

दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) काढण्यासाठी उपप्रादेशिक परिवहनच्या (आरटीओ) सांगली व सावळी कार्यालयात वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत.

'Waiting' 11 thousand for Sangli vehicles, vehicle holders' ranks in the office | सांगलीत वाहन परवान्यांसाठी ‘वेटिंग’११ हजारांवर, कार्यालयात वाहनधारकांच्या रांगा

सांगलीत वाहन परवान्यांसाठी ‘वेटिंग’११ हजारांवर, कार्यालयात वाहनधारकांच्या रांगा

googlenewsNext
ठळक मुद्देवाहन परवान्यांसाठी वेटिंग ११ हजारांवरकार्यालयात वाहनधारकांच्या रांगा

सचिन लाड

सांगली : दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) काढण्यासाठी उपप्रादेशिक परिवहनच्या (आरटीओ) सांगली व सावळी कार्यालयात वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत.

लायसन्सची प्रक्रिया आॅनलाईन सुरू झाल्याने सध्या कच्चे व पक्के लायसन्स काढण्यासाठी ११ हजार वाहनधारक वेटिंगवर आहेत. मुलाखतीची वेळ घेण्यासाठी आॅनलाईन बुकिंगही फुल्ल आहे. दररोज केवळ १८० वाहनधारकांची परीक्षा घेतली जात असल्याने लायसन्स वेटिंगचा हा आकडा वाढतच आहे.

पूर्वी लायसन्स काढण्याची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण केली जायची. आरटीओंचा एक निरीक्षक दिवसाला कच्चे व पक्के सहाशे ते सातशे लायसन्स देण्याचे काम करीत होता; पण कालांतराने यामध्ये बदल झाला. लायसन्स काढण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, परीक्षेमध्ये असणाऱ्या नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी लायसन्स कच्चे असो अथवा पक्के, ते काढण्यासाठी आॅनलाईन नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे.

नोंदणी केल्यानंतर मुलाखतीची वेळ दिली जाते. ही माहिती संबंधित वाहनधारकाच्या मोबाईलवर मिळते. यामध्ये मुलाखतीची तारीख, वेळ व ठिकाणाची माहिती दिली जाते. त्यानुसार वाहनधारक कागदपत्रे घेऊन जातात.
कच्चे लायसन्ससाठी संगणकावर २० मिनिटांची परीक्षा घेतली जाते.

यामध्ये वाहतूक नियमांचे प्रश्न विचारले जातात. या परीक्षेत नापास झाले, तर पुन्हा आॅनलाईन नोंदणी करून मुलाखतीची वेळ घ्यावी लागते. कच्चे लायसन्ससाठी दररोज दोनशे वाहनधारकांना बोलाविले जात आहे.

कच्चे लायसन्स मिळाल्यानंतर एक महिन्यानंतर पक्के लायसन्स काढण्यासाठी पुन्हा आॅनलाईन नोंदणी करून मुलाखतीची वेळ घ्यावी लागते. सध्या पक्के लायसन्ससाठी सर्वाधिक वाहनधारक वेटिंगवर आहेत. पक्के लायसन्सची प्रक्रिया सावळीत पार पडली.

वास्तविक नोंदणी केल्यानंतर तीन-चार दिवसांत लायसन्स मिळाले पाहिजे; पण वाहनांची वाढती संख्या, लायसन्स काढण्यास होणारी गर्दी व परिवहन आयुक्तांच्या नव्या आदेशामुळे वाहनधारकांना लायसन्स मिळण्यास विलंब लागत आहे.

पक्का परवाना : एप्रिलपर्यंत नोंदणी

कच्चे व पक्केलायसन्ससाठी प्रत्येकी शंभर वाहनधारकांची आॅनलाईन नोंदणी होत आहे. १९ मार्चपर्यंत सात हजार वाहनधारक वेटिंगवर आहेत. तर पक्क्या लायसन्ससाठी १९ एप्रिलपर्यंत नोंदणी फुल्ल झाल्याने सात हजार वाहनधारक वेटिंगवर आहेत. जरी आता कोणी नोंदणी केली तर त्याला मे, जून महिन्यांत लायसन्ससाठी मुलाखतीची वेळ दिली जात आहे.

शिबिरांचे आयोजन

सावळीत एका आरटीओ निरीक्षकाने दररोज ६० वाहनधारकांची परीक्षा घेण्याचा आदेश परिवहन आयुक्तांना दिला आहे. त्यानुसार दररोज १२० वाहनधारकांना मुलाखतीची वेळ देऊन बोलाविले जात आहे. दोन निरीक्षक ही प्रक्रिया पार पडतात. अनेकदा एकच निरीक्षक असतात. त्यामुळे त्यादिवशी केवळ ६० वाहनधारकांची परीक्षा घेतली जाते. दररोज प्रत्येक तालुक्यात शिबिर भरवून शंभर ते सव्वाशे वाहनधारकांची परीक्षा घेऊन लायसन्स दिले जात आहे.

Web Title: 'Waiting' 11 thousand for Sangli vehicles, vehicle holders' ranks in the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.