संततधारेमुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:42 PM2018-07-16T23:42:30+5:302018-07-16T23:42:35+5:30

Varna river water due to its subsurface | संततधारेमुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर

संततधारेमुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर

Next


सांगली : वारणा (चांदोली) धरण क्षेत्रात पाचव्यादिवशी अतिवृष्टी होऊन चोवीस तासांत १०७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणाचे चार दरवाजे दोन मीटरने उंचलले असून, ११ हजार ९३० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातून विसर्ग वाढविल्यामुळे दुपारी तीनपासून वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून शिवारात शिरले आहे. नदीवरील तीन पूल पाण्याखाली गेले आहेत. पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सोमवारी दिवसभर संततधार पाऊस चालूच होता.
वारणा धरण क्षेत्रातून १४ हजार ७३ क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक धरणात होत आहे. धरण क्षेत्रात सलग पाचव्यादिवशी अतिवृष्टी झाली आहे. गेल्या २४ तासांत १०७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वारणा धरणात २८.९७ टीएमसी पाणीसाठा झाला असून, चार दरवाजे सव्वादोन मीटरने उचलल्यामुळे धरणातून दुपारपासून बारा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू आहे. मुसळधार पाऊस व धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठच्या वस्त्यांवरील कुटुंबांनी जनावरे, साहित्य गावामध्ये हलविले आहे. महावितरणनेही नदीकाठच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा बंद केला आहे. वारणा नदीवरील पूल आरळा-शित्तूर, कोकरुड-रेठरे बंधारा आणि मांगले-काखे पूल पाण्याखाली गेल्यामुळे शाहूवाडी ते शिराळा तालुक्यातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
कोयना धरण क्षेत्रातही चोवीस तासात १९२ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे धरणात ७१.९९ टीएमसी पाण्याचा साठा झाला आहे. मुसळधार पाऊस सुरु राहिल्यास कोयना धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येईल, असा इशारा पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी दिला आहे. यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांनाही सावधानतेचा इशारा दिला आहे. सांगली आयर्विन पूल येथे कृष्णेची पाणीपातळी १७ फुटांवर गेली आहे.

Web Title: Varna river water due to its subsurface

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.