हणमंतवडिये येथे येरळा पुलावरून ट्रॅक्टर कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 03:56 PM2017-10-24T15:56:14+5:302017-10-24T16:02:31+5:30

हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे दाट धुक्यामुळे येरळा नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर नदीपात्रात कोसळला. या ट्रॅक्टरखाली सापडून चालक हरिलाल कोजीभाई गोगारी (पटेल, वय ४०, रा. सिद्धेश्वर इंडस्ट्रीयल एरिया, खानापूर नाका, विटा) जागीच ठार झाले. सोमवारी सकाळी सव्वासात वाजता ही घटना घडली.

The tractor collapsed on the Yerala Bridge at Hanumantwadiya | हणमंतवडिये येथे येरळा पुलावरून ट्रॅक्टर कोसळला

हणमंतवडिये येथे येरळा पुलावरून ट्रॅक्टर कोसळला

Next
ठळक मुद्देट्रॅक्टरखाली सापडून चालक जागीच ठार दाट धुक्यामुळे अपघातहणमंतवडिये येथील येरळा नदीच्या पुलावर अपघात

कडेगाव , दि. २४ :हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे दाट धुक्यामुळे येरळा नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर नदीपात्रात कोसळला. या ट्रॅक्टरखाली सापडून चालक हरिलाल कोजीभाई गोगारी (पटेल, वय ४०, रा. सिद्धेश्वर इंडस्ट्रीयल एरिया, खानापूर नाका, विटा) जागीच ठार झाले. सोमवारी सकाळी सव्वासात वाजता ही घटना घडली.


हरिलाल गोगारी ट्रॅक्टर (क्र. एमएच १० २८६७) घेऊन कडेगावहून विट्याकडे निघाले होते. सव्वासात वाजण्याच्या सुमारास ते हणमंतवडिये येथील येरळा नदीच्या पुलावर आले असता, दाट धुक्यामुळे त्यांंना पुलाचा कठडा दिसला नाही व ट्रॅक्टर कठड्यावर आदळला. ट्रॅक्टरच्या धडकेने कठडा तुटून ट्रॅक्टर पुलावरून थेट खाली कोसळला.

या ट्रॅक्टरखाली सापडून गोगारी जागीच ठार झाले. अपघातात ट्रॅक्टरचाही चक्काचूर झाला. या घटनेची नोंद कडेगाव पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार खरमाटे करीत आहेत.

Web Title: The tractor collapsed on the Yerala Bridge at Hanumantwadiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.