‘टरमरिक सिटी’ सांगलीचा नावलौकिक कायम_ यंदा १२ लाखांवर हळद पोत्यांची आवक शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:00 PM2018-05-19T23:00:52+5:302018-05-19T23:00:52+5:30

संपूर्ण देशातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ म्हणून सांगलीचा असलेला नावलौकिक कायम आहे. यंदाचा हळदीचा हंगाम अंतिम टप्प्याकडे येत असतानाच,

'Tarmerik City' Sangli's reputation goes on: this year, 12 lakh pearls of turmeric can be possible. | ‘टरमरिक सिटी’ सांगलीचा नावलौकिक कायम_ यंदा १२ लाखांवर हळद पोत्यांची आवक शक्य

‘टरमरिक सिटी’ सांगलीचा नावलौकिक कायम_ यंदा १२ लाखांवर हळद पोत्यांची आवक शक्य

googlenewsNext
ठळक मुद्देसमाधानकारक दर; हंगाम अंतिम टप्प्याकडे; दर्जा टिकवण्यात यश

शरद जाधव ।
सांगली : संपूर्ण देशातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ म्हणून सांगलीचा असलेला नावलौकिक कायम आहे. यंदाचा हळदीचा हंगाम अंतिम टप्प्याकडे येत असतानाच, गेल्यावर्षीप्रमाणेच हळदीची चांगली आवक होत असून दर्जेदार हळदीमुळे शेतकऱ्यांना दरही समाधानकारक मिळत आहे.

स्वयंपाकघरातील फोडणीपासून ते सौंदर्यप्रसाधने, औषधांपर्यंत जगभरात मागणी असलेल्या हळदीने सांगलीच्या बाजारपेठेला झळाळी निर्माण केली आहे. दरवर्षी जानेवारी ते मे महिन्याअखेर हळदीचा हंगाम चालत असतो. मात्र, आता वर्षभरच थोड्याफार प्रमाणात हळदीची आवक होत असल्याने, वर्षभर सांगलीच्या बाजारपेठेत व्यवहार सुरू असतात. स्थानिक हळदीबरोबरच तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकातील हळदीला सांगलीची बाजारपेठ सर्वात सुरक्षित मानली जाते. त्यामुळे हळदीची आवकही समाधानकारक होत आहे. यंदाचा ९० टक्के हंगाम पूर्ण झाला असून जून महिन्याच्या अखेरपर्यंत हळदीची चांगली आवक होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या हंगामाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शेतकºयांना गेल्यावर्षीपेक्षा हजार ते बाराशे रूपये जादा दर मिळाला आहे. शेतकºयांनीही दरवर्षीच उसाचे पीक नको, अशी मानसिकता बनवत हळदीचे उत्पादन वाढविल्याने, सरतेशेवटी आवक वाढण्याची शक्यता आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जमिनीची ‘बेवड’ टाकण्यात येत असल्यानेही उत्पादनात वाढ झाली आहे.

हळदीचे क्षेत्र असलेल्या भागात दिवाळीच्यादरम्यान चांगला पाऊस झाला. त्यामुळे हळदीचे वजन व गुणवत्ता वाढण्यासही मदत झाली. सांगलीत राजापुरी, सेलमला प्रति क्विंटल सरासरी ७५०० ते ८ हजार रूपये, पावडर क्वालिटीला ७२०० ते ७५०० रूपये, देशी कडप्पाला ७५०० रूपये, कमी दर्जाच्या हळदीला ६५००, तर उच्च दर्जाच्या हळदीला ११ हजार ते १२ हजार ५०० रूपयांपर्यंत दर मिळाला आहे. गेल्यावर्षी ११ लाखांवर हळद पोत्यांची आवक झाली होती. यंदा ती जूनअखेर १२ लाखांवर जाण्याची शक्यता आहे.

देशातील हळदीचे पीक घेणाºया प्रमुख राज्यांत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. निजामाबाद, राजापुरी, सेलम हळद ही जगभरात प्रसिध्द आहे. आंध्र प्रदेशातील निजामाबाद व कडाप्पा या दोन ठिकाणांहून हळदीची जगभरात निर्यात होत असते.

जळगावची हळद सांगलीला
जळगाव परिसर केळीसाठी प्रसिध्द आहे. मात्र, जळगाव, येवला, रावेर, धुळे भागात हळदीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यंदा या भागातून ३ लाख पोती हळदीची आवक सांगलीच्या बाजारपेठेत झाली. केळीपेक्षा हळदीला दर चांगला मिळत असतानाच शेतीचा पोतही सुधारत असल्याने त्या भागात वाढलेल्या हळदीचा सांगलीला फायदा होत आहे.

हळदीची वार्षिक उलाढाल ५०० ते ६०० कोटी
७ हजारजणांना रोजगाराची निर्मिती
८० ते १०० कोटींपर्यंत परकीय चलनाची प्राप्ती
१२ लाख पोती हळद आवक अपेक्षित

 

यंदाचा हंगाम समाधानकारक
सांगलीत हळदीला समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकरीही हळद विक्रीसाठी आणत असतात. यंदाही चांगली आवक सुरू असून, दर्जेदार हळद येत असल्याने शेतकºयांना दरही समाधानकारक मिळत आहे. यंदा कोणतेही विघ्न न येता हंगाम अंतिम टप्प्यात येत आहे. सर्व घटकांच्या सहकार्यामुळेच हंगाम व्यवस्थित होत आहे.
- गोपाल मर्दा, माजी अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स, सांगली.

बाजार समितीचे पूर्ण सहकार्य
हळद बाजारपेठेचा नावलौकिक वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. बाजार समितीतील सर्व व्यापारी, हमाल, तोलाईदार बांधव व इतर सर्व घटकांच्या सहकार्यामुळेच यंदाचा हंगाम कोणत्याही अडथळ्यांविना अंतिम टप्प्यात आहे. यापुढे हळद बाजारपेठेसाठी व उत्पादकांसाठी सोयी देण्यास प्राधान्य देणार आहे.
- दिनकर पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली.

Web Title: 'Tarmerik City' Sangli's reputation goes on: this year, 12 lakh pearls of turmeric can be possible.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.