भूसंपादनास विरोधासाठी काँग्रेसचा रास्ता रोको मिरज-पंढरपूर रस्त्यावर वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 12:30am

मिरज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गास भूसंपादनाला विरोधासाठी काँग्रेस नेते प्रा. सिध्दार्थ जाधव यांच्या नेतृत्वाखाली टाकळी, बोलवाड व मालगाव परिसरातील शेतकऱ्यांनी

मिरज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गास भूसंपादनाला विरोधासाठी काँग्रेस नेते प्रा. सिध्दार्थ जाधव यांच्या नेतृत्वाखाली टाकळी, बोलवाड व मालगाव परिसरातील शेतकऱ्यांनी मिरज-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. शेतकºयांच्या जनसुनावणीत संमत झाल्याप्रमाणे रत्नागिरी-नागपूर महामार्ग व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आमदार सुरेश खाडे यांनी, शाळेजवळून महामार्ग जावा यासाठी राजकीय वजन वापरून सुमारे १०० मीटर महामार्गात बदल केला आहे. यामुळे मालगाव, सुभाषनगर, टाकळी, बोलवाड येथील शेतकऱ्यांची ५५ घरे, २२ विहिरी, कूपनलिका, जनावरांचे गोठे बाधित होऊन जमीनदोस्त होणार आहेत. यापूर्वी जनसुनावणीमध्ये पाच रस्त्यांचे पर्याय सुचविण्यात आले होते. त्याप्रमाणे पर्याय क्रमांक तीन सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. यामुळे केवळ दोनच घरे बाधित होऊन क्षारपड व नापीक जमिनीतून महामार्ग जाणार होता. त्यामुळे पर्याय क्रमांक तीनप्रमाणेच महामार्ग करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली.

काँग्रेस नेते प्रा. सिध्दार्थ जाधव म्हणाले, आ. खाडे सुडाचे राजकारण करीत आहेत. एरंडोलीत रस्ताच नसलेल्या ठिकाणी पूल बांधत आहेत. लोकप्रतिनिधी जनतेचा सेवक असतो, हे आमदारांना माहीत नाही. माजी सभापती अनिल आमटवणे म्हणाले, जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करणाºयांवर गुन्हे दाखल करून आ. खाडे सुडाचे राजकारण करीत आहेत. मतदार संघात त्यांनी कोणतेही विधायक काम केलेले नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी सतत आंदोलने करताना आम्ही सत्ताधाºयांच्या दबावाला बळी पडणार नाही.

मालगावचे शेतकरी किशोर सावंत म्हणाले, स्वत:च्या फायद्यासाठी आ. खाडे शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. त्याचा हिशेब येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी देतील.

नामदेव करगणे म्हणाले, शेतकरीविरोधी भाजप सरकारचे आमदार असल्याने आ. खाडे शेतकºयांच्या विरोधातच आहेत. शेतकºयांनी प्रा. सिध्दार्थ जाधव यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन त्यांनी केले. मालगाव, सुभाषनगर, टाकळी, बोलवाड, भोसे, कळंबी, कवठेमहांकाळ पसिरातील शेतकरी आंदोलनात सहभागी होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रास्ता रोकोमुळे सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. चुकीचे अधिग्रहण मूळ महामार्गाच्या आराखड्याऐवजी चुकीच्या पध्दतीने अधिग्रहण प्रक्रिया सुरू असल्याचा व जमीन अधिग्रहण करताना लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपाने बागायत शेतीतून महामार्ग वळविण्यात आल्याचा आरोप यावेळी प्रा. सिध्दार्थ जाधव यांनी केला. राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनास विरोधासाठी काँग्रेस नेते प्रा. सिध्दार्थ जाधव यांच्या नेतृत्वाखाली टाकळी, बोलवाड व मालगाव परिसरातील शेतकऱ्यानी मिरज-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.

संबंधित

दुष्काळात पाण्याच्या व्यवसायाचा सुकाळ : आटपाडी तालुक्यात उत्पन्नाचा नवा मार्ग
बनावट नोटा विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक गांधीनगरात कारवाई : साडेसात हजारांच्या नोटा जप्त
जीवनदायी कृष्णा नदीच ठरतेय आरोग्याला धोकादायक कारण...
कडेगाव तालुक्यातील कर्जाच्या थकबाकीत वाढ-: शेतकऱ्यांकडून ३८ कोटीचे देणे थांबले
व्यापाऱ्यांच्या नोटिसांचा प्रश्न मुंबईतही अधांतरीच : गोयल यांचे केवळ आश्वासन

सांगली कडून आणखी

दुष्काळात पाण्याच्या व्यवसायाचा सुकाळ : आटपाडी तालुक्यात उत्पन्नाचा नवा मार्ग
बनावट नोटा विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक गांधीनगरात कारवाई : साडेसात हजारांच्या नोटा जप्त
जीवनदायी कृष्णा नदीच ठरतेय आरोग्याला धोकादायक कारण...
कडेगाव तालुक्यातील कर्जाच्या थकबाकीत वाढ-: शेतकऱ्यांकडून ३८ कोटीचे देणे थांबले
व्यापाऱ्यांच्या नोटिसांचा प्रश्न मुंबईतही अधांतरीच : गोयल यांचे केवळ आश्वासन

आणखी वाचा