सांगलीत राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेस प्रारंभ, राष्ट्रीय स्पर्धा आसामला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 08:34 PM2017-11-22T20:34:55+5:302017-11-22T20:37:30+5:30

हरिपूर : राज्यस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेस सांगलीत प्रारंभ झाला, असून वेगवान सायकलिंग रेसचा थरार सांगलीकरांना अनुभवायला मिळत आहे.

Start of Sangli state-level cycling competition, National competition Assam | सांगलीत राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेस प्रारंभ, राष्ट्रीय स्पर्धा आसामला

सांगलीत राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेस प्रारंभ, राष्ट्रीय स्पर्धा आसामला

Next
ठळक मुद्दे‘टाईम ट्रायल’मध्ये क्रीडा प्रबोधिनी अव्वल; े. राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत टाईम ट्रायल प्रकारावर वर्चस्व मिळविले.

हरिपूर : राज्यस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेस सांगलीत प्रारंभ झाला, असून वेगवान सायकलिंग रेसचा थरार सांगलीकरांना अनुभवायला मिळत आहे. राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत टाईम ट्रायल प्रकारावर वर्चस्व मिळविले.

मिरज-पंढरपूर रोडवरील तानंग फाटा ते कुमठा फाटा असा आठ किलोमीटरचा स्पर्धेचा मार्ग होता. सकाळी सात वाजता टाईम ट्रायल प्रकाराच्या स्पर्धा झाल्या. स्पर्धास्थळी दोन वैद्यकीय पथके व पोलिस बंदोबस्त तैनात होता. दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता मास स्टार्ट प्रकाराच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांची सोनपूर (आसाम) येथे होणाºया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याहस्ते निशाण दाखवून स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले होते. प्रशांत पवार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, राष्ट्रीय सायकलपटू दत्ता पाटील, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता हुसेन कोरबू, दीपाली शिळदनकर, मीनाक्षी ठाकूर, निर्मल थोरात, अभय कर्नाळे, भिकन अंबे, प्रदीप शिंगटे, राम जाधव, जे. एन. तांबोळी, गजानन कदम, भारत राजपूत उपस्थित होते.

स्पर्धेचा अंतिम निकाल (अनुक्रमे एक ते तीन क्रमांक) असा :
टाईम ट्रायल प्रकार : १९ वर्षे मुले : संकल्प थोरात (पुणे), निलय मुधाळे (कोल्हापूर), विनय जाधव (क्रीडा प्रबोधिनी). १९ वर्षे मुली : प्रणीता सोमण (पुणे), अक्षदा डोंगरे (पुणे), श्राव्या यादव (औरंगाबाद). १७ वर्षे मुले : ओंकार अंग्रे (क्रीडा प्रबोधिनी), सौरभ काजळे (मुंबई), कृष्णा हराळे (पुणे). १७ वर्षे मुली : मानसी कमलाकर (क्रीडा प्रबोधिनी), प्रतीक्षा चौगुले (कोल्हापूर), मानवी पाटील (कोल्हापूर). १४ वर्षे मुले : अथर्व डहाके (अमरावती), वरद सुर्वे (पुणे), वरद पाटील (कोल्हापूर). १४ वर्षे मुली : पूजा दानोळे (क्रीडा प्रबोधिनी), सिमरन ठाकूर (पुणे), साक्षी जाधव (औरंगाबाद).
फोटोओळी : (फोटो : २२११२०१७सायकलींग )

राज्यस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचे उद्घाटक जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले यांनी सत्कार केला. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेता हुसेन कोरबू, मीनाक्षी ठाकूर, दत्ता पाटील, प्रशांत पवार, भिकन अंबे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Start of Sangli state-level cycling competition, National competition Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.