स्थायी सदस्यांचा सभागृहात ठिय्या- पावसाळी मुरूमावरून वाद : निविदाच न काढल्याने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:12 PM2018-06-19T23:12:31+5:302018-06-19T23:12:31+5:30

महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पुन्हा एकदा पावसाळी मुरूमावरून जोरदार वाद झाला. गत सभेत प्रशासनाने मुरुमाची निविदा काढल्याचे स्पष्ट केले होते. पण मंगळवारी ही बाब खोटी ठरल्याने सर्वच नगरसेवक

Standing Committee Members Standing For The Streets | स्थायी सदस्यांचा सभागृहात ठिय्या- पावसाळी मुरूमावरून वाद : निविदाच न काढल्याने संताप

स्थायी सदस्यांचा सभागृहात ठिय्या- पावसाळी मुरूमावरून वाद : निविदाच न काढल्याने संताप

Next

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत पुन्हा एकदा पावसाळी मुरूमावरून जोरदार वाद झाला. गत सभेत प्रशासनाने मुरुमाची निविदा काढल्याचे स्पष्ट केले होते. पण मंगळवारी ही बाब खोटी ठरल्याने सर्वच नगरसेवक संतप्त झाले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभापतींच्या आसनासमोर ठिय्या मांडत प्रशासनाचा खोटारडेपणा उघडकीस आणला. अखेर आयुक्त, उपायुक्तांनी तीन दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून पावसाळी मुरूम उपलब्ध करण्याची ग्वाही दिल्यानंतर नगरसेवकांनी आंदोलन मागे घेतले.

सभापती बसवेश्वर सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. सभेच्या सुरुवातीला नगरसेवक दिलीप पाटील, शिवराज बोळाज, प्रियांका बंडगर, प्रशांत पाटील यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी पावसाळी मुरूमाचा मुद्दा उपस्थित केला. गत सभेत बांधकामचे उपअभियंता सतीश सावंत यांनी पावसाळी मुरुमाची निविदा काढण्यात आली असल्याचे सांगितले होते. मंगळवारी सदस्यांनी, या निविदेचे काय झाले? अशी विचारणा केली.

त्यावर शहर अभियंता बामणे यांनी, निविदा काढली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सदस्यांचा पारा चढला. सावंत यांनी सभागृहाला खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यावर बांधकाममधील अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला. केवळ शामरावनगरसाठी मुरुमाची निविदा काढल्याचा खुलासा केला.

त्यावर दिलीप पाटील यांनी, गत सभेतील इतिवृत्तांताच्या सत्यप्रती सदस्यांसह अधिकाºयांना दिल्या. गत सभेत सावंत यांनी निविदा काढल्याचे इतिवृत्तात स्पष्टपणे म्हटले होते. प्रशासन पावसाळी मुरुमासाठी टाळाटाळ करीत असल्याचे दिसताच सर्वच सदस्य सभापतींच्या आसनासमोर एकवटले. सदस्यांनी सभागृहात आंदोलन सुरू केले. तब्बल अर्धा ते पाऊण तास नगरसेवकांचे आंदोलन सुरू होते. अधिकाºयांकडून खोटी माहिती दिली जात असल्याबद्दल सदस्यांनी संताप व्यक्त केला.

नगरसेविका बंडगर यांनी, शामरावनगरपेक्षाही दत्तनगरमध्ये दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासनाने मुरूम दिलेला नाही. नागरिकांनाही, प्रशासनाचा खरा चेहरा सांगता येईल, उद्यापर्यंत मुरूम न मिळाल्यास महासभेत आवाज उठवण्याचा इशारा दिला.अखेर उपायुक्त सुनील पवार यांनी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. आयुक्तांनी तीन दिवसांची शॉर्ट नोटीस काढून पावसाळी मुरूम उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर सभेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली.

भावना अन् आशा
प्रशासनाच्या कारभारावर नगरसेवकांनी टीकेची झोड उठवली. उपायुक्त पवार यांनी, प्रशासनाची काम करण्याची भावना आहे. आयुक्तसाहेब निश्चित पावसाळी मुरुमाच्या फाईलवर सह्या करतील असे सांगून सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावर प्रशांत पाटील यांनी, प्रशासनाच्या भावना व आशेवरच सांगलीकर नागरिक आहेत, असा टोला लगावला.

Web Title: Standing Committee Members Standing For The Streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.