धक्कादायक ! सांगली 'सिव्हिल'मध्ये जिवंत रुग्णाला ठरविले मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 06:23 PM2018-06-19T18:23:38+5:302018-06-19T18:23:38+5:30

दुसऱ्याच रुग्णाचा मृतदेह तुमच्याच रुग्णाचा आहे असे म्हणून सिव्हिलच्या प्रशासनाने मंगळवारी चांगलाच गोंधळ घातला. तो रुग्ण अजूनही जिवंत आहे. मात्र तोच मृत झाल्याचे प्रमाणपत्र सिव्हिल प्रशासनाने दिले. या गोंधळाचा रुग्णाच्या नातेवाईकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.

Shocking Dead in Civil Hospital in Sangli, dead | धक्कादायक ! सांगली 'सिव्हिल'मध्ये जिवंत रुग्णाला ठरविले मृत

धक्कादायक ! सांगली 'सिव्हिल'मध्ये जिवंत रुग्णाला ठरविले मृत

googlenewsNext
ठळक मुद्देधक्कादायक ! सांगली 'सिव्हिल'मध्ये जिवंत रुग्णाला ठरविले मृत बेवारस मृतदेह दिला हाती; मृत्यूचे दिले प्रमाणपत्र

सांगली : दुसऱ्याच रुग्णाचा मृतदेह तुमच्याच रुग्णाचा आहे असे म्हणून सिव्हिलच्या प्रशासनाने मंगळवारी चांगलाच गोंधळ घातला. तो रुग्ण अजूनही जिवंत आहे. मात्र तोच मृत झाल्याचे प्रमाणपत्र सिव्हिल प्रशासनाने दिले. या गोंधळाचा रुग्णाच्या नातेवाईकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.

तासगाव येथील अविनाश उर्फ चिलू दादोबा बागवडे (वय 55) यांना दहा दिवसापूर्वी सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास बागवडे यांचा मृत्यू झाला आहे, असे सिव्हिलमधून फोनवरून कळवण्यात आले.

मृतदेहाची उत्तरीय तपासणी करायची असल्याने तातडीने या असेही नातेवाईकांना त्यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर नातेवाईक तातडीने सांगलीत आले. त्यांना थेट उत्तरीय तपासणी कक्षात नेण्यात आले. तेथे बागवडे यांच्या पुतण्याने हा मृतदेह अविनाश बागवडे यांचा नसल्याचे सांगितले. तरीही उत्तरीय तपासणी करून त्यांना जबरदस्तीने मृतदेह ताब्यात घेण्यास भाग पाडले. यावेळी नातेवाईकांना बागवडे यांच्या मृत्यूचा दाखलाही दिला आहे.


नंतर नातेवाईकांनी मृतदेह तासगवला नेला. तेथे सर्वच नातेवाईकांनी तो मृतदेह अविनाश बागवडे यांचा नसल्याचे सांगितले. मंगळवारी दुपारी संतापलेले नातेवाईक त्यांना दिलेला मृतदेह घेऊन सांगलीत आले. त्यांनी सिव्हिल प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. अजूनही सिव्हिलमध्ये गोंधळ सुरू आहे.

Web Title: Shocking Dead in Civil Hospital in Sangli, dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.