शिवप्रतिष्ठानने घडविले शिस्तीचे दर्शन कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती : पांढरी टोपी, भगवे झेंडे, हाती निषेधाचे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:21 AM2018-03-29T01:21:34+5:302018-03-29T04:35:23+5:30

सांगली : जिल्हाभरातूून आलेल्या कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग व उन्हाचा पारा वाढत असतानाही शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आपल्या शिस्तीचे दर्शन घडविले.

 Shishu Pritishthan organized the Shishti Darshan with a significant presence of the workers: white hat, saffron flags, handmade pane | शिवप्रतिष्ठानने घडविले शिस्तीचे दर्शन कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती : पांढरी टोपी, भगवे झेंडे, हाती निषेधाचे फलक

शिवप्रतिष्ठानने घडविले शिस्तीचे दर्शन कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती : पांढरी टोपी, भगवे झेंडे, हाती निषेधाचे फलक

Next
ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर, मेवाणी, खालीद यांना अटक करा आंदोलकांची मागणी : निवेदन सादर

सांगली : जिल्हाभरातूून आलेल्या कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग व उन्हाचा पारा वाढत असतानाही शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आपल्या शिस्तीचे दर्शन घडविले. संयोजकांकडून होणाऱ्या सूचना व त्यांचे तंतोतंत पालन करून तरूणांनी अंगी बाणवलेली शिस्त वाखाणण्याजोगीच होती. मोर्चाच्या सुरूवातीपासून ते समाप्तीपर्यंत यात बदल न होता कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

सकाळी आठ वाजलेपासूनच जिल्ह्यासह कोल्हापूर, कर्नाटकातील शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सांगलीत दाखल होत होते. सांगली-मिरज मार्गावरील तीन मार्गापैकी सर्व्हिस रस्ता काही काळ सुरू होता. नंतर ही वाहतूक वळविण्यात आली. मार्केट यार्डपासूनच चहुबाजूला कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत होती, तर दुसरीकडे कॉँग्रेस भवनपासून पुष्पराज चौक रस्त्यावरही डोक्यावर पांढरी टोपी व हातात भगवा ध्वज घेतलेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते.

पुष्पराज चौकातून मार्केट यार्डपर्यंत व राम मंदिरपर्यंत ध्वनिक्षेपक यंत्रणा उभारण्यात आली होती. त्या ठिकाणाहून दिल्या जात असलेल्या सूचनेनुसार मोर्चाचे नियोजन सुरू होते. जिल्हाभरातून आलेले कार्यकर्ते जमल्यानंतर मोर्चास प्रेरणा मंत्रानंतर सुरूवात झाली. मोर्चाच्या सर्वात पुढे मोहनसिंग रजपूत यांनी ध्वज हाती घेतला होता. यावेळी उन्हाची तीव्रताही वाढू लागली होती. तरीही कार्यकर्त्यांनी आपल्यातील शिस्तबध्दता ढळू दिली नाही.

भर उन्हातही कार्यकर्ते घोषणा देत उपस्थितांचा उत्साह वाढवित होते. पिण्याच्या पाण्याचे पाऊच इतरत्र न टाकता कार्यकर्ते आपल्या खिशात ठेवून घेत होते. मोर्चा स्टेशन चौकात आल्यानंतर भर उन्हातच कार्यकर्त्यांनी बैठक मारत निवेदन ऐकले. यावेळीही गडबड गोंधळ न करता कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी केलेले निवेदनाचे वाचन सर्वांनी शांतपणे ऐकून घेतले.

मोर्चातील प्रमुख उपस्थिती...
तेजोमयानंद महाराज (विजयपूर, कर्नाटक), शिवदेव स्वामी (गुरूदेव तपोवन, टाकळी), योगानंद स्वामी (गुरूदेव आश्रम चडचण), यतेश्वर आनंद स्वामी (गुरूदेव आश्रम, कागवाड), शिवयोगी रायच्चा स्वामी (मिरज), बापूसाहेब पुजारी, माजी आ. नितीन शिंदे, दिगंबर जाधव, नगरसेवक युवराज गायकवाड, अनिलभाऊ कुलकर्णी, पांडुरंग कोरे, बजरंग पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

महिलांचा : लक्षवेधी सहभाग
शिवप्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. केलेल्या नियोजनानुसार मोर्चाच्या सुरुवातीला असलेल्या ध्वजानंतर महिलांचा सहभाग होता. पुष्पराज चौकातही सकाळी नऊपासूनच महिला उपस्थित होत्या. निषेधाच्या फलकासह संभाजीराव भिडे यांच्या सन्मानाच्या घोषणा महिलांकडून दिल्या जात होत्या. त्यांनीही हाती भगवे ध्वज घेत उत्साही सहभाग नोंदविला...

प्रकाश आंबेडकर, मेवाणी, खालीद यांना अटक करा
आंदोलकांची मागणी : निवेदन सादर

सांगली : पुणे येथील एल्गार परिषदेत झालेली भडकावू भाषणबाजी पाहता, त्यामागे जातीय दंगल घडविण्याचा हेतू स्पष्ट होतो. या परिषदेत सहभागी प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी, उमर खालीद, बी. जी. कोळसे पाटील, सुधीर ढवळे यांच्यासह वक्ते, संयोजकांना दंगलीस जबाबदार धरून गुन्हे दाखल करावेत, त्यांना अटक करावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानच्यावतीने बुधवारी सन्मान मोर्चावेळी करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
सांगलीत बुधवारी शिवप्रतिष्ठानच्यावतीने संभाजीराव भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी सन्मान मोर्चा काढण्यात आला. मोर्चावेळी शिवप्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. रावसाहेब देसाई, बाळासाहेब बेडगे, शशिकांत हजारे, शशिकांत नागे, राजू बावडेकर, प्रदीप बाफना, धनंजय मद्वाण्णा यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. या निवेदनाचे स्टेशन चौकात मोर्चेकºयांसमोर कार्यवाह नितीन चौगुले यांनी वाचन केले.
गोविंद महाराज समाधीजवळ वादग्रस्त फलक लावणाºयांची चौकशी करावी, एल्गार परिषदेतील वक्ते व संयोजकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, ३ जानेवारी रोजी मुंबईत कोम्बिंग आॅपरेशनवेळी कोरेगाव-भीमाची भित्तीपत्रके व आक्षेपार्ह कागदपत्रांसह चार नक्षलवादी सापडले, त्यांचा या दंगलीशी संबंध असल्याचे सरकारने जाहीर करावे. दंगलीत बळी गेलेल्या राहुल फटांगळे याच्या मारेकऱ्यांना व दंगलीला प्रोत्साहन देणाºयावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, भिडे यांच्याबद्दल खोटी तक्रार देणाऱ्या महिलेविरूद्ध कारवाई करावी, प्रकाश आंबेडकर यांच्याकडून दंगलीतील नुकसानीची वसुली करावी, आंबेडकर यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई, वीरेंद्र तावडे यांची कारागृहातून मुक्तता करावी आदी मागण्या करण्यात आल्या.

शिस्तबध्द नियोजन
मोर्चामध्ये सहभागी कार्यकर्त्यांना वारंवार सूचना दिल्या जात होत्या आणि त्या सूचनांचे तंतोतंत पालन शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून होत होते. मोर्चाच्या अग्रभागी असलेल्या ध्वजाच्या पुढे कोणीही जाऊ नये, अशी सूचना आल्यानंतर मोर्चा स्टेशन चौकात पोहोचेपर्यंत कोणीही कार्यकर्ता पुढे गेला नाही. मोर्चा स्टेशन चौकात पोहोचल्यानंतर उन्हाची तीव्रता अधिक होती. यावेळी संयोजकांनी कार्यकर्त्यांना बसून घ्यावे, अशी सूचना केल्यानंतर सर्वांनी भर उन्हात बैठक मारली व मोर्चात उत्साहात सहभाग घेतला. शिवप्रतिष्ठानच्या या शिस्तबध्दतेचे कौतुक होत होते.

Web Title:  Shishu Pritishthan organized the Shishti Darshan with a significant presence of the workers: white hat, saffron flags, handmade pane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.