सांगलीत भाजपचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 11:56 PM2018-04-12T23:56:57+5:302018-04-12T23:56:57+5:30

Sangliyat BJP's Fasting | सांगलीत भाजपचे उपोषण

सांगलीत भाजपचे उपोषण

Next


सांगली : संसदेचे कामकाज चालू न देणाऱ्या विरोधकांचा निषेध करीत भाजपने पुकारलेल्या देशव्यापी उपोषणाचा भाग म्हणून सांगलीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यासह भाजप नेते व कार्यकर्त्यांनी गुरुवारी उपोषण केले.
सांगलीच्या विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनासाठी याठिकाणी मोठा मंडप उभारण्यात आला होता. उपोषणावेळी विरोधकांच्या भूमिकेचा निषेधही भाजप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी खासदार संजयकाका पाटील म्हणाले की, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेस व इतर सर्वच विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केला. सातत्याने सभागृहाचे कामकाज बंद पाडण्यात आले. लोकसभेचे जेमतेम ४३ तास, तर राज्यसभेचे ४५ तास कामकाज होऊ शकले. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचे २४८ तास वाया गेले. त्यामुळे देशभरातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय होऊ शकलेले नाहीत. विकास कामांना खो घालणाºया या विरोधकांना आता जनताच उत्तर देईल. लोकशाहीच्या विरोधात कृती होत असताना आत्मक्लेश म्हणून आम्ही एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आहोत. जनतेला विरोधकांचे खरे रुप आता कळाले आहे. त्यांच्यामुळेच विकासाला खीळ बसत असल्याचे चित्र आहे. भाजपने प्रामणिकपणे जनहिताच्या निर्णयासाठी प्रयत्न केले आहेत, असे पाटील म्हणाले.
आमदार सुधीर गाडगीळ, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मकरंद देशपांडे, दिनकर पाटील, शेखर इनामदार, युवा मोर्चाचे अध्यक्ष व स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर, दीपकबाबा शिंदे, वैभव शिंदे, मुन्नाभाई कुरणे, इस्लामपूर नगराध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती अरुण राजमाने, शिक्षण व आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी-पाटील, भारती दिगडे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे आदींसह भाजपचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपोषणाला बसले होते.
संजयकाकांचे उपोषण : पाचवी वेळ
संजयकाका पाटील यांनी उपोषण करण्याची त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील ही पाचवी वेळ ठरली आहे. कॉँग्रेस, राष्टÑवादी, स्थानिक विकास आघाडी अशा विविध पक्ष, संघटनांच्या माध्यमातून विविध प्रश्नांवर यापूर्वी त्यांनी चारवेळा उपोषण केले होते. यापूर्वी विरोधी पक्षाच्या भूमिकेतून त्यांनी आंदोलन केले होते. सत्ताधारी पक्षात असूनही उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर प्रथमच आली.

Web Title: Sangliyat BJP's Fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.