सांगलीत पंधरा लाखांचा ऐवज लंपास, बंगला फोडला : २६ तोळे दागिन्यासह दीड लाखाच्या रोकडवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क on Tue, January 02, 2018 6:25pm

विश्रामबाग येथील खोजा कॉलनीजवळ गजानन कॉलनीत राहणारे चाँदमोहम्मद जानमहोम्मद खान यांचा बंगला फोडून चोरट्यांनी २६ तोळे सोन्याचे दागिने, दोनशे ग्रॅम चांदी, दीड लाखाची रोकड, टीव्ही व दुचाकी असा दहा लाखाचा ऐवज लंपास केला. सोमवारी दुपारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. ​​​​​​​

सांगली : विश्रामबाग येथील खोजा कॉलनीजवळ गजानन कॉलनीत राहणारे चाँदमोहम्मद जानमहोम्मद खान यांचा बंगला फोडून चोरट्यांनी २६ तोळे सोन्याचे दागिने, दोनशे ग्रॅम चांदी, दीड लाखाची रोकड, टीव्ही व दुचाकी असा दहा लाखाचा ऐवज लंपास केला. सोमवारी दुपारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. चाँदमोहम्मद खान यांचे कुपवाड रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथे प्लॅस्टर आॅफ पॅरीस विक्रीचे दुकान आहे. ३० डिसेंबरला ते कुटूंबासह जवळगाव येथे नातेवाईकांच्या लग्नास गेले होते. मध्यंतरीच्या काळात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कडी व कोयंडा उचकटून प्रवेश केला.

दोन बेडरुमधील कपाटे फोडून त्यामधील साहित्य विस्कटले. लॉकरमधील सोन्याच्या पाटल्या, गंठण, मंगळसूत्र, चेन, नेकलेस, बिलवर असे २६ तोळ्याचे दागिने, दोनशे ग्रॅम चांदीचे दागिने व दीड लाखाच्या रोकडवर डल्ला मारला.

हॉलमधील अठरा इंची टीव्ही तसेच गॅलरीत लावलेली दुचाकीही लंपास केली. सोमवारी दुपारी खान कुटूंब जळगावाहून परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खान कुटूंब जळगावला गेले, त्याचदिवशी रात्री चोरी झाल्याचा संशय आहे. चोरट्यांचा माग काढण्यास श्वान पथकास पाचारण केले होते. श्वान जवाहर हौसिंग सोसायटीपर्यंत गेले. तिथेच ते घुटमळले. ठसे तज्ञांना एक ठसा मिळाला आहे. त्याआधारे पोलिसांनी तपासाला दिशा दिली आहे.

बंगल्याची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर एक रिकामे मोते सापडले. यामध्ये कटावणी आढळून आली. ही कटावणी चोरट्यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कटावणीने त्यांनी कडी व कोयंडा उचकटला असण्याची शक्यता आहे. त्यावरील ठसे व बंगल्यातील कपाटावर मिळालेल्या ठशांची तपासणी केली जाणार आहे. पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांनीही भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्हीची मदत खान यांच्या बंगल्यासमोर एक बंगला आहे. या बंगल्याबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला आहे. या कॅमेºयातील शनिवारपासून ते सोमवारी दुपारपर्यंत सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फुटेज तपासणी सुरु आहे. महत्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. तपासासाठी दोन पथके बाहेरील जिल्'ात पाठविण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

संबंधित

लोणावळ्याच्या वलवन धरणात अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू 
पवनाधरणामध्ये एक पर्यटक बुडाला 
जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 
धुळ्यात अवैध पार्किंग सर्वसामान्यांच्या ‘जीवा’वर
शेम... धावत्या ट्रेनमध्ये भाजपा नेत्याचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

सांगली कडून आणखी

पाणी टंचाई असणाऱ्या जत गावांत टँकर सुरू करा, विलासराव जगताप : जतमध्ये आढावा बैठक;
मिरजेत अनधिकृत कत्तलखान्यास ठोकले सील-मांस विक्रेत्यांकडून आंदोलनाचा इशारा
सावरकर संमेलनास ग्रंथदिंडीने प्रारंभ: सांगली, मिरज शहरात शोभायात्रा
श्वानांवरील कर आकारणी रद्द : सांगली महापालिकेत काँग्रेसची पक्षबैठक -आज शिक्कामोर्तब
विरोधकांकडून केवळ दिशाभूल- शिवाजीराव नाईक

आणखी वाचा