सांगली :  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिकेचे रणशिंग :सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 04:02 PM2018-05-19T16:02:13+5:302018-05-19T16:07:18+5:30

आगामी सांगली महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ताकदीने उतरणार आहे. महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवार दि. ४ जून रोजी सांगलीत येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील स्टेशन चौकात जाहीर सभा घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी  पत्रकार बैठकीत दिली.

Sangli: The trumpeter of the municipal corporation in the presence of Chief Minister: Subhash Deshmukh | सांगली :  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिकेचे रणशिंग :सुभाष देशमुख

सांगली :  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिकेचे रणशिंग :सुभाष देशमुख

Next
ठळक मुद्देसांगली :  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिकेचे रणशिंग :सुभाष देशमुख फडणवीस, गडकरी चार जूनला सांगलीत

सांगली : आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ताकदीने उतरणार आहे. महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवार दि. ४ जून रोजी सांगलीत येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील स्टेशन चौकात जाहीर सभा घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी  पत्रकार बैठकीत दिली.

दरम्यान, चार व पाच जूनला सांगलीतच भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

देशमुख म्हणाले, १९९२ नंतर प्रथमच भाजपची राज्य कार्यकारिणीची बैठक ४ व ५ जूनला होणार आहे. भाजपचे राज्य अधिवेशन महापालिका निवडणुकीच्या वातावरण निर्मितीस पोषक ठरणार आहे. विश्रामबाग येथील खरे क्लब हाऊस येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीस भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, राज्य, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी असे ७०० हून अधिकजण उपस्थित राहणार आहेत.

पहिल्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार असून दिवसभरात शासनाच्या विविध योजना, आगामी महापालिका निवडणूक या विषयावर सविस्तर चर्चा व ठराव होणार आहेत. ५ जून रोजी गडकरी समारोप समारंभावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, लक्ष्मण सावजी, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, दिनकर पाटील, दीपक शिंदे, नीता केळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

इच्छुकांना प्रवेश

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणारच आहे. राज्य कार्यकारिणी सभेच्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर प्रवेश होतील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
 

Web Title: Sangli: The trumpeter of the municipal corporation in the presence of Chief Minister: Subhash Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.