सांगलीत व्यापाऱ्यांचा बंद- सेवाकराच्या नोटिसांबद्दल संताप : सात कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:34 AM2018-10-16T00:34:39+5:302018-10-16T00:37:23+5:30

येथील मार्केट यार्डातील १३०० व्यापाºयांना केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयाने बजाविलेल्या नोटिशीविरोधात सोमवारी मार्केट यार्डात व्यापाºयांनी कडकडीट बंद पाळला. केंद्रीय जीएसटी कार्यालयाकडून व्यापाºयांची पिळवणूक सुरू असून, व्यापाºयांचा कोणताही दोष नसताना कारवाई सुरूच ठेवल्यास त्याविरोधात

 Sangli Traders Shuts Off- Severe Notice of Service: Seven crore turnover jam | सांगलीत व्यापाऱ्यांचा बंद- सेवाकराच्या नोटिसांबद्दल संताप : सात कोटींची उलाढाल ठप्प

सांगलीत व्यापाऱ्यांचा बंद- सेवाकराच्या नोटिसांबद्दल संताप : सात कोटींची उलाढाल ठप्प

Next
ठळक मुद्दे सांगलीत व्यापाऱ्यांचा बंद सेवाकराच्या नोटिसांबद्दल संताप : सात कोटींची उलाढाल ठप्पमुनगंटीवार यांची भेट घेत सेवाकराच्या अन्यायकारक नोटिसीविरोधात दाद मागितली होती

सांगली : येथील मार्केट यार्डातील १३०० व्यापाºयांना केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयाने बजाविलेल्या नोटिशीविरोधात सोमवारी मार्केट यार्डात व्यापाºयांनी कडकडीट बंद पाळला. केंद्रीय जीएसटी कार्यालयाकडून व्यापाºयांची पिळवणूक सुरू असून, व्यापाºयांचा कोणताही दोष नसताना कारवाई सुरूच ठेवल्यास त्याविरोधात बेमुदत व्यापार बंद आंदोलन छेडण्याचा इशारा व्यापाºयांनी दिला आहे. दरम्यान, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी अधिकाºयांची भेट घेत व्यापाºयांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली.

सांगली मार्केट यार्डातील १३०० व्यापाºयांना केंद्रीय सेवा व कर कार्यालयाकडून ३० जुलै २०१२ पासूनच्या अडत व कमिशनवरील सेवाकर भरण्याच्या नोटिसा आल्या आहेत. नोटिशीनुसार दंड भरण्याची व दंड न भरल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात फक्त सांगलीतच व्यापाºयांना सेवाकराच्या नोटिसा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाºयांनी पंधरा दिवसांपूर्वी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत सेवाकराच्या अन्यायकारक नोटिसीविरोधात दाद मागितली होती. त्यांनी कारवाई न करण्याचे आश्वासन दिले होते.

तरीही अधिकाºयांकडून कारवाई सुरू केल्यानेच याच्या निषेधार्थ सोमवारी मार्केट यार्डातील व्यापाºयांनी लाक्षणिक बंद पाळला. संपूर्ण दिवसभर मार्केट यार्डातील सर्व व्यवहार बंद होते. यावेळी चेंबर कार्यालयासमोर सर्व व्यापाºयांनी एकत्र जमत सेवाकर कार्यालयाच्या कारभाराचा निषेध केला. व्यापाºयांच्या मागणीला बाजार समितीनेही आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, सुरेश पाटील, गोपाल मर्दा, शीतल पाटील सहभागी झाले होते.

बाजार समितीचे : अधिकाºयांना निवेदन
व्यापारी बंदच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, सचिव एन. एम. हुल्याळकर यांनी केंद्रीय जीएसटी अधिकाºयांची भेट घेत निवेदन सादर केले. यात कार्यालयाने बजाविलेल्या नोटिसा रद्द करण्याची मागणी केली. अडते, व्यापारी यांना शेतकºयांच्या हिशेबपट्टीतून सेवाकर वसूल करण्याचा अधिकार नाही. व्यापाºयांनीही तो शेतकºयांकडून वसूल केलेला नाही. त्यामुळे कारवाई मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

Web Title:  Sangli Traders Shuts Off- Severe Notice of Service: Seven crore turnover jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.