पतीसोबत झाला वाद, महिलेनं तीन मुलींसह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:34 PM2018-04-09T12:34:03+5:302018-04-09T14:14:35+5:30

किरकोळ वादातून पतीशी वाद झाल्यानंतर विवाहितेने तीन मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वज्रचौंडे (ता. तासगाव) येथे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. विवाहिता व तिच्या लहान मुलीचा शोध सुरु आहे.

Sangli: Suicide in well-being with three daughters of marriage in Vajrachond | पतीसोबत झाला वाद, महिलेनं तीन मुलींसह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

पतीसोबत झाला वाद, महिलेनं तीन मुलींसह विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

Next
ठळक मुद्देवज्रचौंडेत विवाहितेची तीन मुलीसह विहिरीत आत्महत्यापतीशी वाद : दोन मुलींचे मृतदेह सापडले; दोघींचा शोध सुरु

सांगली : किरकोळ वादातून पतीशी वाद झाल्यानंतर विवाहितेने तीन मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वज्रचौंडे (ता. तासगाव) येथे सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. विवाहिता व तिच्या लहान मुलीचा शोध सुरु आहे.



सुनीता सुभाष राठोड (वय ३२), तिच्या मुली आशा (४ वर्षे), उषा (४ वर्षे) व ऐश्वर्या (२ वर्षे, सर्व मूळ रा. लमाणतांडा-विजापूर) अशी मृतांची नावे आहेत. यापैकी आशा व उषा या जुळ्या बहिणी आहेत. राठोड कुटूंब तीन महिन्यापूर्वी वज्रचौंडे येथे रस्त्याच्या कामाचे दगड फोडण्यासाठी आले आहे.

सुनीताच्या दोन बहिणी व भाऊही याच कामासाठी आले आहेत. ते गावातच माळावर झोपडी बांधून राहत होते. रविवारी कामावर सुट्टी असल्याने राठोड कुटुंब घरीच होते. सुनीताचे पती सुभाष लालसिंग राठोड (४०) याच्या खिशातील पैशाचे पाकीट गायब होते.

याबाबत त्याने सुनीताकडे विचारणा केली. यातून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर सुभाष दुपारी बारा वाजता मेहूण्याला घेऊन ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी सावळज (ता. तासगाव) येथे गेला. त्याच्या पाठोपाठ सुनीताही तीन मुलींना घेऊन घरातून बाहेर पडली. घरापासून काही अंतरावर असलेल्या संभाजी वसंत जाधव यांच्या विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली.



सुभाष राठोड हा दुपारी चार वाजता घरी आला. सुनीता व मुली घरी नव्हत्या. त्याने परिसरात शोध घेतला. पण त्यांचा कुठेच सुगावा लागला नाही. सायंकाळी विहिरीचे मालक संभाजी जाधव विहिरीवरील पाण्याची मोटर बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना विहिरीत चप्पलाचे दोन जोड तरंगताना आढळून आले. त्यांनी राठोड यांच्या वस्तीवर जाऊन विहिरीत चप्पल फेकू नका, असे सांगितले. त्यावेळी सुभाष राठोड यास संशय आला. त्याने विहिरीत जाऊन पाहिल्यानंतर या चप्पला मुलींच्या असल्याचे ओळखले.

सुनीताने मुलीसह आत्महत्या केल्याचा त्याला संशय आला. तासगाव पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तोपर्यंत अंधार झाल्याने या चौघींचा शोध घेता आला नाही. सोमवारी सकाळी शोध मोहिम सुरु करण्यास पोलीस व स्थानिक ग्रामस्थ गेले. आशा व उषा या जुळ्या बहिणींचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. दोरखंडाच्या मदतीने दोघींचे मृतदेह बाहेर काढले. सुनीता व ऐश्वर्याचा शोध सुरु आहे.

विहिर ५० फूट
संभाजी जाधव यांची विहीर ५० फूट खोत आहे. यामध्ये सध्या केवळ दहा फूट पाणी आहे. विहिरीला पाच ते सात फुटापर्यंत बांधीव काठ आहे. पायऱ्या नसल्याने विहिरीत उतरता येत नाही. त्यामुळे या चौघींचे मृतदेह काढताना खूप अडचणी आल्या.

Web Title: Sangli: Suicide in well-being with three daughters of marriage in Vajrachond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.