सांगली : कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या, हरिपुरातील घटना : गळफास घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:48 PM2018-06-09T12:48:52+5:302018-06-09T12:48:52+5:30

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला, पण कमी गुण मिळाल्याने हरिपूर (ता. मिरज) येथील साहिल उदय कोलवेकर (वय १५) या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. घटनेची सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद आहे.

Sangli: Student's suicide due to low quality, incidents of Haripura: got slapped | सांगली : कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या, हरिपुरातील घटना : गळफास घेतला

सांगली : कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या, हरिपुरातील घटना : गळफास घेतला

googlenewsNext
ठळक मुद्देकमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्याहरिपुरातील घटना : गळफास घेतला

सांगली : दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला, पण कमी गुण मिळाल्याने हरिपूर (ता. मिरज) येथील साहिल उदय कोलवेकर (वय १५) या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. घटनेची सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद आहे.


साहिल सांगलीतील इमॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होता. त्याने दहावीची परीक्षा दिली होती. शुक्रवारी निकाल जाहीर झाला. यामध्ये तो ५३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला होता. सायंकाळी त्याने घरी तसेच गल्लीत पेढे वाटले. त्यानंतर तो गणपती मंदिरात दर्शनासाठी गेला होता.

रात्री जेवण केल्यानंतर तो बेडरुमध्ये जाऊन बसला होता. त्याचे आई-वडील घराबाहेर बोलत बसले होते. त्यावेळी साहिलने ओढणीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आई-वडील घरात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

मुलाच्या या कृत्याने त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. साहिलच्या वडिलांचा सराफी व्यवसाय आहे. त्याला मोठा भाऊ आहे. तो अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी परगावी असतो.

Web Title: Sangli: Student's suicide due to low quality, incidents of Haripura: got slapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.