सांगली : राम कदम यांची हकालपट्टी करा : मनीषा रोटे, इस्लामपूर येथे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 02:38 PM2018-09-08T14:38:07+5:302018-09-08T14:40:24+5:30

भाजप सरकारच्या काळात रस्त्यावर महिला असुरक्षित असताना, आता त्याच पक्षाचे आमदार मुलींना घरातून पळवून नेण्याची भाषा करतात. भाजपचे आमदार राम कदम यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करून पक्षाने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. मनीषा रोटे यांनी केली.

Sangli: Removal of Ram Kadam: Prohibition at Manisha Rote, Islampur | सांगली : राम कदम यांची हकालपट्टी करा : मनीषा रोटे, इस्लामपूर येथे निषेध

सांगली : राम कदम यांची हकालपट्टी करा : मनीषा रोटे, इस्लामपूर येथे निषेध

googlenewsNext
ठळक मुद्देराम कदम यांची हकालपट्टी करा : मनीषा रोटेइस्लामपूर येथे महिला काँग्रेसच्यावतीने निषेध

इस्लामपूर : भाजप सरकारच्या काळात रस्त्यावर महिला असुरक्षित असताना, आता त्याच पक्षाचे आमदार मुलींना घरातून पळवून नेण्याची भाषा करतात. भाजपचे आमदार राम कदम यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करून पक्षाने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी महिलाकाँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. मनीषा रोटे यांनी केली.

येथील तहसील कचेरीाजवळ महिला काँग्रेसच्यावतीने भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र शिंदे, प्रदेश प्रतिनिधी आर. आर. पाटील, पं. स. सदस्य अ‍ॅड. विजय खरात यांची उपस्थिती होती. अ‍ॅड. रोटे म्हणाल्या, भाजपने कदम यांची पक्षातून हकालपट्टी करावी.

यावेळी राजेंद्र शिंदे, आर. आर. पाटील, माधुरी डोईफोडे, संपतराव पाटील, कल्पना कांबळे, राजू वलांडकर यांचीही भाषणे झाली. यावेळी ताहीर वारुसे, राजेंद्र भोसले, अल्ताफ मुजावर, रचना शिंदे, किरण पाटील, छाया पाटील, रेश्मा संदे, शुभांगी बेलवलकर, अर्जुन वडार, प्रिया शिंदे, कांचन रोटे उपस्थित होते.

Web Title: Sangli: Removal of Ram Kadam: Prohibition at Manisha Rote, Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.