सांगली : जिल्ह्यात बारावीचे एक, तर दहावीची पाच केंद्रे कुप्रसिध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 02:16 PM2018-02-19T14:16:28+5:302018-02-19T14:22:59+5:30

सांगली जिल्ह्यात बारावीचे संख नंबर एक आणि दहावीच्या पाच परीक्षा केंद्रांवर कॉपीबहादरांचा त्रास असल्यामुळे कोल्हापूर बोर्डाने ती सर्व केंद्रे कुप्रसिध्द, तर बारावीचे शिराळा उपद्रवी आणि दहावीची पाच परीक्षा केंदे्र उपद्रवी म्हणून जाहीर केली आहेत.

Sangli: One in the district, one in class X and one in the center of the 10th grade was notorious | सांगली : जिल्ह्यात बारावीचे एक, तर दहावीची पाच केंद्रे कुप्रसिध्द

सांगली : जिल्ह्यात बारावीचे एक, तर दहावीची पाच केंद्रे कुप्रसिध्द

Next
ठळक मुद्देकॉपीबहादरांचा त्रास असल्यामुळे कोल्हापूर बोर्डाने केले जाहीरकेंद्रांवर सात भरारी पथकांचे लक्ष परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स मशीन बंद

सांगली : जिल्ह्यात बारावीचे संख नंबर एक आणि दहावीच्या पाच परीक्षा केंद्रांवर कॉपीबहादरांचा त्रास असल्यामुळे कोल्हापूर बोर्डाने ती सर्व केंद्रे कुप्रसिध्द, तर बारावीचे शिराळा उपद्रवी आणि दहावीची पाच परीक्षा केंदे्र उपद्रवी म्हणून जाहीर केली आहेत. या केंद्रांवर सात भरारी पथकांचे लक्ष असणार आहे. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स मशीन बंद ठेवण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत.

बारावीची लेखी परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते २० मार्चअखेर होणार आहे. बारावी परीक्षेसाठी ३६ हजार ८८५ विद्यार्थी संख्या असून, ४५ केंद्रांवर व्यवस्था केली आहे. यापैकी शिराळा उपद्रवी आणि संख नंबर १ कुप्रसिध्द परीक्षा केंद्र म्हणून बोर्डाने जाहीर केले आहे.

दहावीची परीक्षा दि. १ ते २४ मार्चअखेर होणार आहे. यासाठी ४३ हजार ८१९ विद्यार्थी असून, १०३ केंद्रांवर परीक्षेची व्यवस्था केली आहे. मिरज तालुक्यातील मालगाव, शिराळा तालुक्यातील शिराळा नंबर एक, वाळवा तालुक्यातील वाळवा, येलूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची अशी पाच उपद्रवी आणि मिरज तालुक्यातील एरंडोली, मिरज नंबर एक, वाळवा तालुक्यातील भवानीनगर, जत तालुक्यातील उमदी, तसेच कवठेमहांकाळ अशी पाच केंद्रे कुप्रसिध्द आहेत.

Web Title: Sangli: One in the district, one in class X and one in the center of the 10th grade was notorious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.