सांगली : मौजे डिग्रजमध्ये पूर्ववैमनस्यातून एकावर खुनी हल्ला, संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:47 PM2018-10-19T12:47:27+5:302018-10-19T12:53:28+5:30

पूर्ववैमनस्यातून मौजे डिग्रज (ता. मिरज) येथील प्रकाश कलगोंडा पाटील (वय ४६) यांच्यावर वाहनाच्या शॉकअपसरने खुनीहल्ला करण्यात आला. बुधवारी सकाळी मौजे डिग्रजमध्ये बसस्थानक चौकात ही घटना घडली. याप्रकरणी संशयित विनायक नामदेव बंडगर (२७, मौजे डिग्रज) यास सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

Sangli: The murder of the suspect, the suspect arrested on one of the pre-emptive seizures in the premises | सांगली : मौजे डिग्रजमध्ये पूर्ववैमनस्यातून एकावर खुनी हल्ला, संशयितास अटक

सांगली : मौजे डिग्रजमध्ये पूर्ववैमनस्यातून एकावर खुनी हल्ला, संशयितास अटक

Next
ठळक मुद्देपूर्ववैमनस्यातून एकावर खुनीहल्ला मौजे डिग्रजमध्ये घटना : संशयितास अटक

सांगली : पूर्ववैमनस्यातून मौजे डिग्रज (ता. मिरज) येथील प्रकाश कलगोंडा पाटील (वय ४६) यांच्यावर वाहनाच्या शॉकअपसरने खुनी हल्ला करण्यात आला. बुधवारी सकाळी मौजे डिग्रजमध्ये बसस्थानक चौकात ही घटना घडली. याप्रकरणी संशयित विनायक नामदेव बंडगर (२७, मौजे डिग्रज) यास सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

हल्ल्यात जखमी झालेल्या प्रकाश पाटील यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांचा काही महिन्यापूर्वी संशयित विनायक बंडगर यांच्याशी किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. तेंव्हापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते.

रस्त्यावर समोरासमोर भेट झाली तर ते एकमेकांकडे रागाने पाहत असत. बुधवारी सकाळी पाटील शेताला निघाले होते. बसस्थानक चौकात आल्यानंतर तिथे एका गॅरेजमध्ये बंडगर बसला होता. दोघांनी एकमेकांकडे रागाने पाहिले. यातून त्यांच्यात वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले.

बंडगरने गॅरेज दुकानातील शॉकअपसर घेऊन पाटील यांच्या डोक्यात घातला. त्यानंतर त्याने शिवीगाळ करुन आता कसा जगतोस पाहतो, असे म्हणाला. बंडगरविरुद्ध खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Sangli: The murder of the suspect, the suspect arrested on one of the pre-emptive seizures in the premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.