सांगली : शरद पाटील यांना मोडी लिपीतील मानपत्र, राज्यातील पहिलाच उपक्रम मिरजेत, भाषा प्रसारासाठी उचलले अनोखे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 03:52 PM2018-01-22T15:52:55+5:302018-01-22T16:05:22+5:30

मोडी लिपीच्या प्रसार आणि प्रचारासाठी मिरज महाविद्यालयातील इतिहास विभागामार्फत माजी आमदार प्रा. शरद पाटील यांना त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणाबद्दल मोडी लिपीतील मानपत्र देऊन गौरविण्यात आले. एखाद्या मान्यवर व्यक्तीला मोडी लिपीतून मानपत्र देण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याचा दावा महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने केला आहे.

Sangli: A memorandum for Sharad Patil, the first activity in the state, the unique step taken for spreading the language | सांगली : शरद पाटील यांना मोडी लिपीतील मानपत्र, राज्यातील पहिलाच उपक्रम मिरजेत, भाषा प्रसारासाठी उचलले अनोखे पाऊल

मिरज महाविद्यालयातील इतिहास विभागामार्फत माजी आमदार प्रा. शरद पाटील यांना त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणाबद्दल मोडी लिपीतील मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मानपत्र अमृतराव सुर्यवंशी यांच्याहस्ते प्रा. शरद पाटील यांना प्रदान करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. सी.टी. कारंडे, उपप्राचार्य डॉ. एस. बी. गायकवाड, इतिहासविभाग प्रमुख डॉ.सुवर्णा पाटील, मोडीतज्ञ मानसिंगराव कुमठेकर उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देशरद पाटील यांना मोडी लिपीतील मानपत्रराज्यातील पहिलाच उपक्रम मिरजेतभाषा प्रसारासाठी उचलले अनोखे पाऊल

मिरज : मोडी लिपीच्या प्रसार आणि प्रचारासाठी मिरज महाविद्यालयातील इतिहास विभागामार्फत माजी आमदार प्रा. शरद पाटील यांना त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणाबद्दल मोडी लिपीतील मानपत्र देऊन गौरविण्यात आले. एखाद्या मान्यवर व्यक्तीला मोडी लिपीतून मानपत्र देण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असल्याचा दावा महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने केला आहे.

प्रा. शरद पाटील यांनी नुकतेच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा.शरद पाटील यांचा हा अमृतमहोत्सव अभिनव पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय मिरज महाविद्यालयातील इतिहास विभागाने घेतला.

इतिहासविभाग प्रमुख डॉ. सुवर्णा पाटील यांनी मोडी लिपीतून मानपत्र देण्याची कल्पना मांडली. त्यासाठी त्यांनी शरद पाटील यांच्या कायार्चा गौरव करणारे मानपत्र अतिशय सुंदर शब्दात तयार केले.


सदर मराठी मानपत्र मिरजेतील मोडीतज्ज्ञ मानसिंगराव कुमठेकर यांच्याकडून मोडी लिपीत लिप्यंतरीत करून घेण्यात आले. त्यानंतर मिरजेतील इतिहासप्रेमी छायाचित्रकार रणधीर मोरे यांनी त्याचा कलात्मक मांडणी केली. या सर्वांच्या प्रयत्नातून मोडी लिपीतील एक सुंदर मानपत्र आकाराला आले.

सदरचे मानपत्र अमृतराव सुर्यवंशी यांच्याहस्ते प्रा. शरद पाटील यांना प्रदान करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. सी.टी. कारंडे, उपप्राचार्य डॉ. एस. बी. गायकवाड, इतिहासविभाग प्रमुख डॉ.सुवर्णा पाटील, मोडीतज्ञ मानसिंगराव कुमठेकर उपस्थित होते.

मोडी लिपीतून एखाद्या मान्यवराला मानपत्र देण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम असावा, असे अमृतराव सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले. या अभिनव उपक्रमाचे आयोजन मिरज महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने केले.

Web Title: Sangli: A memorandum for Sharad Patil, the first activity in the state, the unique step taken for spreading the language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.