सांगली : सभागृहात डमरू वाजवायला गेला आहात काय? : हार्दिक पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 07:08 PM2018-10-16T19:08:36+5:302018-10-16T19:12:36+5:30

विटा : महाराष्ट्रातील भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षणाचे दिलेले आश्वासन पाळले नसून, सरकार वेळकाढूपणा करीत आहे. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक ...

Sangli: Have you gone to the DM House to play? : Hardik Patel | सांगली : सभागृहात डमरू वाजवायला गेला आहात काय? : हार्दिक पटेल

सांगली : सभागृहात डमरू वाजवायला गेला आहात काय? : हार्दिक पटेल

Next
ठळक मुद्देप्रत्येक राज्यात समाजाला लोकसंख्येनुसार आरक्षण द्याकेवळ विरोधी पक्षानेच आवाज उठविला पाहिजे असे नाही

विटा : महाराष्ट्रातील भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षणाचे दिलेले आश्वासन पाळले नसून, सरकार वेळकाढूपणा करीत आहे. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करता येत नसेल, तर तुम्ही सभागृहात डमरू वाजवायला गेला आहात काय? महाराष्टÑातील भाजप सरकार जुमलेबाजीतच अडकल्याची टीका गुजरात येथील पाटीदार समाज आरक्षण आंदोलनाचे प्रणेते हार्दिक पटेल यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

धनगर समाजाच्या महामेळाव्यासाठी हार्दिक पटेल विटामार्गे आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) गावाकडे रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधून आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले की, धनगर समाजाला यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा थोर वारसा आहे. मात्र, या समाजावर अन्याय होत आहे. प्रत्येक राज्यात समाजाला लोकसंख्येनुसार शिक्षण, नोकरी व राजकीय आरक्षण दिले पाहिजे. परंतु, लोकसंख्येवर आरक्षण दिले तरी, प्रत्येक समाजात कष्ट घेणाºयांच्या गुणवत्तेला न्याय मिळाला पाहिजे. कोणताही समाज जोपर्यंत शैक्षणिक प्रगती करीत नाही आणि घटनात्मक पध्दतीने मजबूत होत नाही, तोपर्यंत  देशाची प्रगती होणार नाही.

सरकारने लोकसंख्येनुसार आरक्षण दिले नाही तर, जो समाज पाठीमागे आहे, तो जास्तच मागे राहणार आहे. ज्या समाजाला सामाजिक, राजकीय आणि आर्थिक भागीदारी मिळणार नाही, त्याला तुम्ही जास्तच मागे फेकून देणार आहात काय? नेत्याच्या मुलानेच नेतेगिरी करावी काय? जिल्हाधिकाºयाचा मुलगाच जिल्हाधिकारी होणार काय? पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही, असे कोठे लिहिले आहे?  लोकांनी तुम्हाला विश्वासाने सत्तेवर बसविले असताना, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करता येत नसेल, तर तुम्ही सभागृहात डमरू वाजवायला गेला आहात काय? असे अनेक सवालही यावेळी पटेल यांनी केले.

ते म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षणाचे दिलेले आश्वासन पाळले नसून, धनगर आणि धनगड शब्दांचा खेळ करून सरकार वेळकाढूपणा करीत आहे. महाराष्टÑातील भाजप सरकार जुमलेबाजीतच अडकले आहे. यावेळी धनगर समाज आरक्षण आंदोलनाचे नेते गोपीचंद पडळकर, उद्योजक शरद बाबर उपस्थित होते.

जनतेनेही रस्त्यावर उतरावे
आपला देश घटनेवर चालतो. आरक्षण दिल्यानंतर प्रगती का होत नाही, याचा विचार सरकारने केला पाहिजे. गरिबांना सुविधा देण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे जेथे समाजावर अन्याय होत असेल, तेथे केवळ विरोधी पक्षानेच आवाज उठविला पाहिजे असे नाही. आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी आता जनतेनेही रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी हार्दिक पटेल यांनी व्यक्त केली.

Web Title: Sangli: Have you gone to the DM House to play? : Hardik Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.