विद्यापीठ उपकेंद्रासाठी सांगलीत जनचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 06:49 PM2018-12-12T18:49:48+5:302018-12-12T18:50:44+5:30

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीत होण्यासाठी सुधार समितीमार्फत व्यापक जनचळवळ उभारणार असून त्यासाठी महाविद्यालये, संस्था, विद्यार्थी संघटना, प्राध्यापक संघटना, राजकीय पक्ष, विविध संघटना,

Sangli district for University sub-station | विद्यापीठ उपकेंद्रासाठी सांगलीत जनचळवळ

विद्यापीठ उपकेंद्रासाठी सांगलीत जनचळवळ

googlenewsNext
ठळक मुद्दे सुधार समितीचे प्रयत्न : ग्रामपंचायती, विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन

सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीत होण्यासाठी सुधार समितीमार्फत व्यापक जनचळवळ उभारणार असून त्यासाठी महाविद्यालये, संस्था, विद्यार्थी संघटना, प्राध्यापक संघटना, राजकीय पक्ष, विविध संघटना, ग्रामपंचायतींना पाठिंबा देऊन चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन आम्ही केले आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे यांनी दिली.

याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकामध्ये शिंदे यांनी सांगितले की, व्यापक जनहित, विद्यार्थ्यांचे हित, कायदेशीर तरतूद आदी बाबी लक्षात घेऊन विद्यापीठाचे उपकेंद्र हे जिल्'ाच्या मुख्यालयाजवळ होणे आवश्यक आहे. यादृष्टीने उपकेंद्रासाठी कवलापूर येथे रद्द झालेल्या विमानतळाची जागा सर्वचदृष्टीने योग्य ठरते. या जागेमध्ये हे उपकेंद्र व्हावे, अशी मागणी सांगली जिल्हा सुधार समितीने केली असून त्याचा पाठपुरावा सुरु आहे. या मागणीसाठी आता व्यापक जनचळवळ उभी करणार असून त्यासाठी सांगलीसह परिसरातील महाविद्यालये, संस्था, विद्यार्थी संघटना, प्राध्यापक संघटना, राजकीय पक्ष, विविध संघटना, ग्रामपंचायत आदींनी समितीच्या मागणीला पाठिंबा देण्याचे आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ मधील तरतुदीनुसार विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली येथे करावयाचे प्रस्तावित आहे. जिल्'ातील विविध तालुक्यांमध्ये ते केंद्र व्हावे, अशी मागणी सुरू झाली आहे. परंतु कायद्यातील तरतूद पाहिली असता, उपकेंद्र करण्यासाठी केवळ जागा किंवा भौगोलिक क्षेत्र इतकाच निकष नाही. कायदेशीर तरतुदीनुसार ते केंद्र हे जिल्'ाचे प्रवेशद्वार असणार आहे. प्रशासकीय सोयीसोबतच संशोधन, शैक्षणिक विस्तार, विस्तारित उपक्रम तसेच विद्यापीठाची कार्यक्षमता व प्रभाव वाढण्याच्यादृष्टीने या केंद्राची निर्मिती करावयाची आहे. या सर्व बाबींचा विचार केला असता, हे उपकेंद्र सांगलीलगत होणे आवश्यक आहे. यासाठी विद्यापीठ उपकेंद्र समितीने सांगली प्रशासनाला पत्र देऊन सांगलीच्या मुख्यालयापासून २५ किलोमीटरच्या आतील १०० एकर जागा आरक्षित करून देण्याची मागणी केली होती. त्याला प्रशासनाने दाद न दिल्याने हे उपकेंद्र इतरत्र लांब अंतरावरच्या मागणी केलेल्या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे.

या पत्रकावर प्रा. आर. बी. शिंदे, सुधीर नवले, जयंत जाधव, महालिंग हेगडे, तानाजी रुईकर, उदय निकम, अभिषेक खोत, जगदीश लिमये, हर्षवर्धन आलासे, संजय जाधव, रोहित शिंदे आदींसह कार्यकर्त्यांच्या स'ा आहेत.

Web Title: Sangli district for University sub-station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.