सांगली जिल्ह्यातील दोन कारखान्यांचे कार्यालय दिले पेटवून, ऊसदर आंदोलन भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:43 PM2019-01-12T12:43:30+5:302019-01-12T13:18:11+5:30

उसाची पहिली उचल २३00 रुपये जमा झाल्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. सांगली जिल्ह्यातील क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगाव येथील आॅफिस काही अज्ञातांनी आज, शनिवारी पेटवून दिले तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे गेट केन आॅफिस पेटवून दिले.

Sangli district, the office of two factories, lit the agitation | सांगली जिल्ह्यातील दोन कारखान्यांचे कार्यालय दिले पेटवून, ऊसदर आंदोलन भडकले

सांगली जिल्ह्यातील दोन कारखान्यांचे कार्यालय दिले पेटवून, ऊसदर आंदोलन भडकले

Next
ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन तीव्र दोन कारखान्यांचे कार्यालय दिले पेटवून

सांगली : उसाची पहिली उचल २३00 रुपये जमा झाल्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. सांगली जिल्ह्यातील क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगाव येथील आॅफिस काही अज्ञातांनी आज, शनिवारी पेटवून दिले तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे गेट केन आॅफिस पेटवून दिले.


स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे कार्यालयच बंद करण्याचा धडाका सुरू केला आहे. साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने झाले तरीही अद्याप एकाही साखर कारखान्यांनी एफआरपी जमा केली नव्हती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या एफआरपीत मोडतोड केल्यास तीव्र आंदोलन करू असा गर्भित इशारा दिला होता.



सांगली जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर २३00 रुपये वर्ग केल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे, याचाच परिणाम म्हणून आज सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांची गेटकेन आॅफिस कार्यकर्त्यांनी पेटवून दिले.


दरम्यान, आज कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची नांदणी येथे तातडीची बैठक बोलावून पुढे आंदोलनाची दिशा ठरणार असून खासदार राजू शेट्टी या बैठकीस मार्गदर्शन करणार आहेत, तसेच स्वाभिमानीची ताकद दाखवून देऊ असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. स्वाभिमानी पुन्हा आंदोलन सुरु केल्याने ऊस क्षेत्र, साखर कारखाने व त्यांच्या विभागीय कार्यालयांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.



ऊस दरासाठी दोन महिन्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोनल सुरु केले. तब्बल दहा दिवस आंदोलन पेटत राहिले. त्यानंतर कारखानदार, शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक होऊन तोडगा निघाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर साखर कारखाने सुरळीत सुरु राहिले.

उसाची पहिली प्रतिटन २३०० रुपयांची उचल शेतकऱ्यांना खात्यावर जमा केली. ही उचल एफआरपीप्रमाणे एकरकमी जमा करण्यात आलेली नाही. केवळ ८० टक्के रक्कम जमा केली आहे. बैठकीत ठरल्याप्रमाणे कारखानदारांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याप्रमाणे आंदोलन सुरु केले आहे. 
कुंडलच्या क्रांती कारखान्याचे घोगाव येथे विभागीय कार्यालय आहे.

शुक्रवारी मध्यरात्री या कार्यालयावर कार्यकर्त्यांनी हल्ला करुन ते पेटवून दिले. कार्यालयातील महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. कृष्णा कारखान्याचे रेठरेहरणाक्ष येथील कार्यालयही पेटवून दिले. यामधील टेबल, खुर्चा जळाल्या आहेत. कागदपत्रे टेबल ठेऊन जाळण्यात आली आहेत.

शनिवारी सकाळी कर्मचारी कार्यालय उघडण्यास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दोन्ही ठिकाणी अनुक्रमे पलूस व इस्लामपूर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. कर्मचाऱ्यांनी कार्यालयाची स्वच्छता करुन काम सुरु केले आहे. स्वाभिमानीने सुरु केलेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यात पुन्हा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. 

पोलीस बंदोबस्त

स्वाभिमानीच्या आंदोलनाची दखल घेऊन पोलिसांनी जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने व त्यांच्या विभागीय कार्यालयांना पोलीस संरक्षण पुरविण्यात आले आहे. ऊस क्षेत्रातही बंदोबस्त तैनात करण्यात आला. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात आली आहे. सर्वच कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे पहिली उचल न दिल्याने आंदोलनाचा पुन्हा भडा उडण्याची शक्यता आहे.

Web Title: Sangli district, the office of two factories, lit the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.