Sangli: The camel has picked up the tent of the BJP: Sambhaji Pawar, My signature of five years ago was true | सांगली  :उंटाने भाजपचा तंबू उचललाच : संभाजी पवार, पाच वर्षापूर्वीचे माझे संकेत ठरले खरे
सांगली  :उंटाने भाजपचा तंबू उचललाच : संभाजी पवार, पाच वर्षापूर्वीचे माझे संकेत ठरले खरे

ठळक मुद्देउंटाने भाजपचा तंबू उचललाच : संभाजी पवार पाच वर्षापूर्वीचे माझे संकेत ठरले खरेलवकरच राजकीय भूमिका स्पष्ट करणार

सांगली : पाच वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी मी संजयकाका पाटील यांच्याबाबत दिलेले संकेत खरे ठरत आहेत. उंटाला तंबूत घेऊ नका असे बजावले होते, आता उंटाने भाजपचा तंबू उचलल्याची प्रचिती भाजप नेत्यांना आली आहे, असे प्रतिपादन शनिवारी माजी आमदार संभाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले, सध्या सुरू असलेले राजकारण तत्वहीन आहे. इतके घाणेरडे राजकारण मी कधी पाहिले नाही. केवळ आकडे दाखवून विकासकामांचे नाटक सुरु आहे. हजारो कोटीच्या निधीची जाहिरातबाजी केली, मग निधी कुठे गेला, असा सवाल त्यांनी केला.

आगामी निवडणुकांमध्ये काय भूमिका घ्यायची याचा निर्णय समकालीन राजकीय, सामाजिक मित्र, समर्थकांशी चर्चा करुन जाहीर करू.


Web Title: Sangli: The camel has picked up the tent of the BJP: Sambhaji Pawar, My signature of five years ago was true
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.