अवसायनातील अष्टलिंग पतसंस्थेच्या ठेवी परत : १९९५ मध्ये अडीच कोटीचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 09:26 PM2018-07-17T21:26:23+5:302018-07-17T21:26:50+5:30

Return of Depositary octroi credit institution deposits: In 1995, worth 25 crore | अवसायनातील अष्टलिंग पतसंस्थेच्या ठेवी परत : १९९५ मध्ये अडीच कोटीचा अपहार

अवसायनातील अष्टलिंग पतसंस्थेच्या ठेवी परत : १९९५ मध्ये अडीच कोटीचा अपहार

googlenewsNext
ठळक मुद्दे२३ वर्षात १० कोटी व्याजासह परत; राज्यातील एकमेव उदाहरण

सुरेंद्र शिराळकर
आष्टा : येथील अष्टलिंग नागरी सहकारी पतसंस्थेत १९९५ मध्ये अडीच कोटीचा अपहार झाला होता. या संस्थेतील साडेपाच कोटीच्या ठेवी २००३ अखेर व्याजासह दहा कोटी झाल्या. त्या परत मिळाव्यात म्हणून आंदोलने झाली. आताप्रशासक, अवसायक मंडळ, अष्टलिंग ठेवीदार बचाव समिती यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. २३ वर्षात ठेवीदारांना सुमारे दहा कोटीच्या ठेवी परत करण्यात आल्या. सुमारे २७ लाखांचा शेवटचा हप्ता नुकताच ठेवीदारांना देण्यात आला.
१९९५ मध्ये आष्ट्याच्या अष्टलिंग नागरी सहकारी पतसंस्थेत संचालक व कर्मचाऱ्यांनी अडीच कोटींचा अपहार केला. ठेवीदारांनी ठेवींसाठी तीव्र आंदोलन केले. शासनाने संचालक मंडळ बरखास्त केले व प्रशासक मंडळ नेमले. २००१ मध्ये संचालक मंडळाची निवडणूक झाली. मात्र नूतन संचालक अपहारकर्त्या संचालकांना मदत करीत असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांनी राजीनामा दिला

२००२ मध्ये पुन्हा निवडणूक होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले. त्यांनी मृत ठेवीदारांचे खोटे अंगठे उठवून पैसे हडप केल्याचे सिद्ध झाले. याप्रश्नी ठेवीदारांनी ८३ दिवस ठिय्या आंदोलन केले होते. अखेर ३० सप्टेंबर २००३ रोजी संचालक मंडळ बरखास्त करीत जिल्हा उपनिबंधकांनी संस्था अवसायनात काढली व अवसायक म्हणून वर्ग एकच्या अधिकाºयाची नियुक्ती केली. त्यांनीही कर्जदारांना बेकायदेशीर सूट दिल्याने पुन्हा वाद झाला. पुढे अवसायकांची बदली करण्यात आली.सहायक रजिस्ट्रार इस्लामपूर यांची अवसायक म्हणून नियुक्ती करून अष्टलिंग बचाव समितीचा एक प्रतिनिधी अवसायक मदतनीस म्हणून नेमण्यात आला. पण राजकीय हस्तक्षेपामुळे वसुलीवर मर्यादा येऊ लागल्या.

अखेर जिल्हा उपनिबंधकांनी संस्थेवर अवसायक मंडळ नेमले. या मंडळाचे अध्यक्ष म्हणून सहायक उपनिबंधक इस्लामपूर सचिन गायकवाड यांची, तर अष्टलिंग बचाव समितीचे अमोल पाटील, राजाराम पवार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.१९९५ पासून दहा कोटीच्या ठेवी परत करण्यात अवसायकांना यश आले.जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड, पाटील, पवार यांनी ठेवीदारांना ठेवी पुन्हा मिळवून दिल्या.

* १९९५ मध्ये अष्टलिंग पतसंस्थेत संचालक मंडळ व कर्मचाºयांकडून अडीच कोटीचा अपहार.
* अवसायक मंडळ, ठेवीदार बचाव समिती, सदस्य कर्जदाराच्या दारात बसून पैसे वसूल करीत असत. हे पैसे प्रत्येक ठेवीदारास गुढीपाडवा व दिवाळीस आठ दिवस अगोदर संस्थेसमोर फलक लावून परत केले जात.
* १९९५ मध्ये बंद पडलेल्या संस्थेत ३९ लाखांचा तोटा होता. अवसायक मंडळाने तो भरून काढत संस्था १० लाख नफ्यात आणली.
* सर्व ठेवीदारांना संपूर्ण मुद्दल व अवसायन तारखेपर्यंत संपूर्ण व्याज परत करण्यात आले.
* विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे, तत्कालीन जिल्हा निबंधक प्रकाश अष्टेकर, अवसायक मंडळ अध्यक्ष अमोल डफळे, सदस्य शिवाजी पाटील, राजाराम पवार यांचे यासाठी सहकार्य.

 

Web Title: Return of Depositary octroi credit institution deposits: In 1995, worth 25 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.