शांतिनिकेतनमध्ये रंगली पाऊसगाणी, विद्यार्थी, शिक्षक स्पर्धेत सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:29 PM2019-07-17T12:29:15+5:302019-07-17T12:31:24+5:30

पावसाच्या धारा बसरत असताना हिरव्यागार शांतिनिकेतनमध्ये पावसाची गाणी रंगली. लेफ्टनंट जनरल एस.पी.पी.थोरात अकॅडमीच्यावतीने पाऊस गाणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 90 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत फक्त पावसावरची सदाबहार गाणी सादर केली आणि गाण्यांची बरसात झाली.

Rain fall in Santiniketan | शांतिनिकेतनमध्ये रंगली पाऊसगाणी, विद्यार्थी, शिक्षक स्पर्धेत सहभागी

शांतिनिकेतनमध्ये रंगली पाऊसगाणी, विद्यार्थी, शिक्षक स्पर्धेत सहभागी

Next
ठळक मुद्देशांतिनिकेतनमध्ये रंगली पाऊसगाणी, विद्यार्थी, शिक्षक स्पर्धेत सहभागीदिक्षा रेवाळे, जयदीप पाटील, अथर्व पाटील यांची बाजी

सांगली: पावसाच्या धारा बसरत असताना हिरव्यागार शांतिनिकेतनमध्ये पावसाची गाणी रंगली. लेफ्टनंट जनरल एस.पी.पी.थोरात अकॅडमीच्यावतीने पाऊस गाणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 90 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत फक्त पावसावरची सदाबहार गाणी सादर केली आणि गाण्यांची बरसात झाली.

थोरात अकॅडमीच्यावतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत मिलिंद कांबळे, अतुल पवार, भाविका पेंडसे यांनी परिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. शिक्षकही या स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी संस्थेचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक बी.आर.थोरात, तानाजीराव मोरे, एम.के.अंबोळे आदी मान्यवर उपस्थित होते. अनिकेत शिंदे यांनी संयोजन केले. इनचार्ज सौ. समिता पाटील, संस्थेचे उपसंचालक डी.एस.माने यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले.

स्पर्धेचा निकाल अनुक्रमे-

इयत्ता पहिली ते चौथी- दिक्षा रेवाळे, चंदला नाईक, कार्तिकी पाटील. पाचवी ते सातवी- जयदीप पाटील, मुस्कान रंगरेज, तमशिर शेख. आठवी ते दहावी- अथर्व पाटील, प्राची रायते, भुमिका चव्हाण. शिक्षक गट- रघुनाथ पारधी, अवधूत गंगधर, जीवन मोहिते. महिला- सुनिता उमराणीकर, स्वाती पाटील, ऐश्वर्या कटारे.

Web Title: Rain fall in Santiniketan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.