राज्यकर्त्यांमुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित: पुरुषोत्तम खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 11:56 PM2018-08-19T23:56:15+5:302018-08-19T23:56:20+5:30

Purpose of Maratha Reservation is pending due to the rulers: Purushottam Khedekar | राज्यकर्त्यांमुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित: पुरुषोत्तम खेडेकर

राज्यकर्त्यांमुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित: पुरुषोत्तम खेडेकर

Next

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात व मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांत एकवाक्यता दिसत नाही. त्यातच या आंदोलनामुळे मराठा समाजाविषयी इतर समाजात द्वेष निर्माण झाला आहे. मराठा विरूध्द मराठे वाद तर राज्याला कदापी परवडणारा नसून आजवरच्या राज्यकर्त्यांमुळेच आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित राहिल्याची टीका मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी सांगलीत केली.
मराठा सेवा संघाच्यावतीने आयोजित जनसंवाद दौºयानिमित्त सांगलीत आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत खेडेकर बोलत होते. आरक्षण हे छोटेसे साधन असून अंतिम साध्य नसल्याचे सांगत, जे आंदोलन सुरू आहे, त्याला नेतृत्व मिळाले तरच आंदोलन यशस्वी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
खेडेकर पुढे म्हणाले की, गेल्या वर्षभरात राज्यभर झालेल्या मराठा क्रांती मोर्चांपासून सेवा संघ दूर राहिला आहे. त्यानंतर निघालेल्या प्रतिमोर्चावेळी थोडी जरी गडबड झाली असती, तर वेगळे चित्र निर्माण झाले असते. सध्या तर दंगली निर्माण व्हाव्यात असेच वातावरण निर्माण केले जात आहे. सोशल मीडियावर हे वातावरण अधिक असल्याने मराठा समाजाने सावध भूमिका घ्यावी.
आरक्षण मिळवायचेच असेल, तर त्याचा घटनात्मक पातळीवर विचार करून मगच लढा उभा करायला हवा आणि ओबीसींमध्येच अ ब क ड असे विभाग करून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाला पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी राजेंद्रसिंह पाटील, किरण पाटील, नितीन चव्हाण, उत्तमराव माने, रमेश गुजर, आशा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

खेडेकर य् मोर्चेकºयांत एकवाक्यता नाहीाांनी मराठा क्रांती मोर्चाबद्दल नाराजी व्यक्त केली. मोर्चेकºयांत कोणतीही एकवाक्यता नसल्याने अत्यंत साध्या मागणीसाठी हे मोर्चे झाले. समाजापुढे अनेक प्रश्न असतानाही, सध्या आरक्षणाभोवतीच फिरायला लावण्यात येत आहे. यातून इतर समाजाच्या मनात मराठा समाजाबद्दल तिटकारा, द्वेष निर्माण झाला असून, क्रांती मोर्चाने केलेल्या मागण्या कागदावरच राहिल्या असून इतर प्रश्न बाजूला पडले आहेत, असे ते म्हणाले.

Web Title: Purpose of Maratha Reservation is pending due to the rulers: Purushottam Khedekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.