मिरजेत अनधिकृत कत्तलखान्यास ठोकले सील-मांस विक्रेत्यांकडून आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:37 PM2018-04-20T23:37:40+5:302018-04-20T23:37:40+5:30

A protest signal from the unauthorized slaughter house, seal-meat sellers in Mirza | मिरजेत अनधिकृत कत्तलखान्यास ठोकले सील-मांस विक्रेत्यांकडून आंदोलनाचा इशारा

मिरजेत अनधिकृत कत्तलखान्यास ठोकले सील-मांस विक्रेत्यांकडून आंदोलनाचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देमिरज महापालिका आरोग्य विभागाची कारवाई

मिरज : मिरजेतील मटण मार्केट परिसरात छोट्या जनावरांच्या कत्तलीसाठी वापरण्यात येणाऱ्या खोलीला महापालिकेच्या आरोग्य विभागाने सील ठोकले. महापालिकेने कत्तलखान्याची व्यवस्था न करता केलेल्या या कारवाईमुळे मांस विक्रेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कत्तलखाना प्रश्नावरून मिरजेत संघर्षाची चिन्हे आहेत.
मिरजेतील मटण मार्केटजवळ कबाडे गल्ली येथे एका खोलीत जनावरांची कत्तल करण्यात येते. याबाबत काही नागरिकांच्या तक्रारीमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी येथे कत्तलीसाठी वापरण्यात येणाºया खोलीला शुक्रवारी सकाळी सील ठोकले. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संभाजी मेथे, आरोग्य अधिकारी डॉ. संजय कवठेकर, डॉ. रवींद्र ताटे यांच्या पथकाच्या या कारवाईस मांस विक्रेत्यांनी आक्षेप घेतला आहे. मिरजेत महापालिकेने बेडग रस्त्यावर कत्तलखाना बांधला आहे. मात्र मोठ्या व छोट्या जनावरांसाठी एकाच कत्तलखान्यास विरोध करून, छोट्या जनावरांसाठी स्वतंत्र कत्तलखान्याची मागणी आहे. या विषयावरून तत्कालीन आमदार हाफिज धत्तुरे यांनी महापालिकेवर बकरी मोर्चा काढला होता. स्वतंत्र कत्तलखान्यासाठी मांस विक्रेत्यांनी उपोषण केले होते. स्वतंत्र कत्तलखान्याची व्यवस्था होईपर्यंत मटण मार्केटमध्ये छोट्या जनावरांच्या कत्तलीला महापालिकेने परवानगी दिल्याचा मांस विक्रेत्यांचा दावा आहे. स्वतंत्र कत्तलखान्याबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. मात्र गेल्या १६ वर्षात महापालिकेने स्वतंत्र कत्तलखान्याची व्यवस्था केलेली नाही.
या पार्श्वभूमीवर महापालिका आरोग्य विभागाने अनधिकृत कत्तलखान्याला टाळे ठोकल्याने या विषयावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. मांस विक्रेत्यांनी याबाबत महापौर हारूण शिकलगार यांची भेट घेऊन कारवाई थांबविण्याची मागणी केली. महापौरांनी याबाबत शनिवारी आयुक्त व आरोग्य अधिकाºयांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

छोट्या जनावरांसाठी स्वतंत्र कत्तलखाना बांधून देण्याचा नगरविकास विभागाचा आदेश असतानाही, महापालिकेने तशी व्यवस्था केलेली नाही. महापालिकेच्या चुकीच्या कारवाईविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे खाटीक संघटनेचे अध्यक्ष महंमदसलाम रहिमतपुरे यांनी सांगितले.

Web Title: A protest signal from the unauthorized slaughter house, seal-meat sellers in Mirza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.