साहेबांनी कामातून मने जिंकली : वसंतराव पुदाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:06 AM2018-11-18T00:06:41+5:302018-11-18T00:07:53+5:30

कडेगाव, पलूस तालुक्यातील विकासासाठी डॉ. पतंगराव कदम (साहेब) यांनी अहोरात्र काम केले. विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी लोकांची मने जिंकली होती, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले यांनी केले

 Powered by Blogger | साहेबांनी कामातून मने जिंकली : वसंतराव पुदाले

साहेबांनी कामातून मने जिंकली : वसंतराव पुदाले

googlenewsNext
ठळक मुद्देपलूस पालिकेच्या सभागृहाला पतंगराव कदम यांचे नावकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले व खाशाबा दळवी यांच्याहस्ते सभागृहाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

पलूस : कडेगाव, पलूस तालुक्यातील विकासासाठी डॉ. पतंगराव कदम (साहेब) यांनी अहोरात्र काम केले. विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी लोकांची मने जिंकली होती, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले यांनी केले.पलूस नगरपरिषदेच्या सभागृहाचे ‘डॉ. पतंगराव कदम सभागृह’ असे नामकरण शनिवारी करण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले व खाशाबा दळवी यांच्याहस्ते सभागृहाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी वसंतराव पुदाले बोलत होते. नगराध्यक्ष राजाराम सदामते, उपनगराध्यक्ष स्वाती गोंदील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, नगरसेवक विक्रम पाटील, नितीन जाधव, संदीप सिसाळ, परशुराम शिंदे, विशाल दळवी, सुनीता कांबळे, प्रतिभा डाके, रेखा भोरे, उज्वला मोरे, श्रीमती सुरेखा माळी, अंजनी मोरे, सुरेखा फडनाईक आदी उपस्थित होते.

वसंतराव पुदाले म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी पलूसच्या विकासासाठी अहोरात्र काम केले. संपूर्ण राज्यात आदर्शवत असा कारभार केला, त्यांनी कामातून लोकांची मने जिंकली. असाच आदर्शवत पारदर्शक कारभार नगरसेवकांनी करावा. साहेबांच्या कारभाराचा आदर्श भविष्यात कामाच्या रुपाने आपण पुढे चालू ठेवण्याची गरज आहे.

खाशाबा दळवी म्हणाले, पलूसच्या विकासासाठी नवनवीन योजना आखल्या आहेत. त्या पूर्णत्वासाठी नगरसेवकांनी झोकून देऊन काम केले पाहिजे. नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्णत्वास नेल्या पाहिजेत.
मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये आणखी उल्लेखनीय कामगिरी करू, अशी ग्वाही दिली. गटनेते सुहास पुदाले यांनी स्वागत केले. यावेळी आर. पी. मुळे, शामराव डाके, प्रकाश पाटील, के. डी. कांबळे, विश्वास येसुगडे, गिरीश गोंदील, ऋषिकेश आबा जाधव, धैर्यशील पवार, अधिक दळवी, किरण निकम उपस्थित होते.

शहराचा विकास पतंगरावांमुळेच
नगराध्यक्ष राजाराम सदामते म्हणाले, पलूसचा विकास पतंगराव कदम यांच्यामुळेच झाला आहे. पलूस नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने गौरव करण्यात आला, ही बाब अभिमानास्पद आहे.

पलूस नगरपरिषदेच्या सभागृहाचे डॉ. पतंगराव कदम असे नामकरण शनिवारी करण्यात आले. नामफलकाचे उद्घाटन वसंतराव पुदाले व खाशाबा दळवी यांच्याहस्ते करण्यात आले.

Web Title:  Powered by Blogger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.