उपनिरीक्षक कामटेसह पाच जणांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 4:06am

पोलीस कोठडीतील आरोपी अनिकेत अशोक कोथळे याच्या मृत्यूप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह पाच जणांना गुरुवारी न्यायालयाने १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सांगली : पोलीस कोठडीतील आरोपी अनिकेत अशोक कोथळे याच्या मृत्यूप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह पाच जणांना गुरुवारी न्यायालयाने १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सांगली येथे एका अभियंत्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून दोन हजार रुपये आणि मोबाइल पळविल्याप्रकरणी शहर पोलिसांनी संशयित म्हणून अनिकेत कोथळे आणि अमोल सुनील भंडारे या दोघांना अटक केली होती. सोमवारी रात्री पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत कोथळेचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला. या धक्कादायक प्रकाराची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही दखल घेतली आहे. या प्रकरणी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना नोटीस देऊन चार आठवड्यांत उत्तर मागितले आहे.

संबंधित

सांगलीत प्रवाशाचा अपहरण करून खून
चारित्र्यावर संशय असल्याने, पतीने केली पत्नीची हत्या!
बलात्कार, गर्भपात प्रकरणात पोलीस निरीक्षक निलंबित
कोल्हापूर : कळंबा कारागृहातील कैदी व कुटुंबीयांची अश्रूंनी झाली गळाभेट
पानसरे हत्या प्रकरणात सरकार अपयशी : मेघा पानसरे

सांगली कडून आणखी

प्रेमीयुगुलाच्या पलायनानंतर मुलाच्या आईचे अपहरण : इस्लामपूर माणिकवाडीतील प्रकार
कोल्हापूर रेल्वे रूळावर ’नो एंट्री’
मन में (नहीं) है विश्वास! - समाजभान
सांगली झेडपीच्या अधिकारांवरील अतिक्रमण थांबवा
कामटेसह साथीदारांचे कोठडीत तोंड बंदच : कोठडीत मारले, आंबोलीत जाळले

आणखी वाचा