लावणीला पाच हजारांवर सखींची दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:14 AM2018-02-19T00:14:00+5:302018-02-19T00:14:26+5:30

Planting of five thousand to Lavani | लावणीला पाच हजारांवर सखींची दाद

लावणीला पाच हजारांवर सखींची दाद

Next


इस्लामपूर : ढोलकीच्या तालावर ताल धरायला लावणाºया लावण्यवतींचे नृत्य... ठसकेबाज लावण्यांची बरसात... लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर व सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या बहारदार नृत्यावर सखींनीही ठेका धरला. अशा उत्साही वातावरणात ‘लोकमत’ सखी मंचतर्फे आयोजित लावणी महोत्सवाला पाच हजार सखी सदस्यांनी मोठी दाद दिली. अनेक महिलांनी आपल्यातील नृत्याची कला या सखी मंचच्या व्यासपीठावर सादर केली. यावेळी महिलांनी आणलेल्या शिट्ट्यांच्या आवाजाने परिसर दुमदुमून गेला होता.
येथील औद्योगिक वसाहतीमधील भव्य अशा वातानुकूलित सर्जेराव यादव मल्टिपर्पज हॉलमध्ये लावणी महोत्सव झाला. ‘लोकमत’चे संस्थापक श्रध्देय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव राहुल महाडिक, पालिकेचे पक्षप्रतोद विक्रम पाटील, नगरसेवक शहाजी पाटील, उद्योजक सर्जेराव यादव, पोरवाल ज्वेलर्सचे प्रीतम पोरवाल, अजिंक्य बझारचे अनिल पाटील, पांडुरंग पाटील, रघुनंदन एजन्सीचे अमरसिंह पाटील, आशा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांचे स्वागत शाखा व्यवस्थापक विक्रम हसबनीस, आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे, इस्लामपूर विभागीय प्रतिनिधी अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण दर्डा यांच्या हस्ते करण्यात आला.
‘या रावजी, बसा भाऊजी’ या लावणीने सुरेखा पुणेकर यांची एन्ट्री झाली आणि सखी सदस्यांनी टाळ्या व शिट्ट्यांचा एकच जल्लोष केला. त्यानंतर त्यांनी सादर केलेल्या ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ या लावणीलाही सखींनी विशेष दाद दिली.
कार्यक्रमाचे खास आकर्षण असलेल्या सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची, ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा... इष्काचा गुलकंद खिलवा’ या बहारदार लावणीने एन्ट्री झाली. ‘पारवाळ घुमतंय कसं’, ‘मी मेनका उर्वशी’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘सोडा सोडा राया हा नादखुळा नादखुळा’ अशा एकसे एक लावण्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रम अधिकच बहरत गेला. ‘अधीर मन झाले, लैला मै लैला’ या गाण्यांवर सखींनी ठेका धरला.
महोत्सवात सादर होत असलेल्या प्रत्येक लावणीगणिक महिलांचाही उत्साह द्विगुणित होत होता. त्यांनी मारलेल्या शिट्ट्यांचा आवाज घुमत होता. सखींनी गर्दी करून लावण्यवतींच्या नृत्याबरोबरच स्वत:ही ठेका धरला होता. हा उत्साह शेवटच्या गाण्यापर्यंत कायम होता.
‘जरा खाजवा की बुगडी शोधायला डोकं’, ‘शांताबाई... शांताबाई’, ‘बाई मी लाडाची गं लाडाची, कैरी पाडाची’ या गाण्यांनाही विशेष दाद मिळाली. ‘कारभारी दमानं...’ या लावणीच्या सादरीकरणासाठी सुरेखा पुणेकर यांची थेट महिला प्रेक्षकांतून एन्ट्री झाली आणि सर्वांनी ठेका धरला. मृणाल कुलकर्णी यांनी शेवटी सादर केलेल्या ‘झिंग झिंग झिंगाट’ गाण्यावर तर सगळ्यांनी एकसारखा ताल धरत तुफान दाद दिली. कलाकारांनीही या रसिकतेला तशीच दाद दिली.

ग्रामीण भागातील प्रतिसाद आनंददायी
- करण दर्डा
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांनी ग्रामीण भागातही सखी मंचला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून आनंद व्यक्त केला. त्यांनी ‘लोकमत’ परिवाराच्यावतीने महिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

सखी मंचचा उपक्रम कौतुकास्पद : शेट्टी
राजू शेट्टी म्हणाले. महाराष्ट्रातील शेतकरी चवळवळीला ‘लोकमत’ने नेहमीच साथ दिली आहे. सखी मंचच्या माध्यमातून महिलांना एकत्र करुन त्यांच्यासाठीचा ‘लोकमत’चा उपक्रम तितकाच महत्त्वाचा आहे. इस्लामपूरसारख्या निमशहरी भागातही जवळपास पाच हजारांवर महिलांना हक्काचं व्यासपीठ तयार केले आहे. यासाठी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांचे अभिनंदन.

Web Title: Planting of five thousand to Lavani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली