तासगावात राष्टवादीचे नगरसेवक प्रभावहीन : पालिका सभेत दुबळा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:27 PM2018-06-19T23:27:12+5:302018-06-19T23:27:12+5:30

Nationalist corporators are not affected by the hour: In the municipal meeting weak opposition | तासगावात राष्टवादीचे नगरसेवक प्रभावहीन : पालिका सभेत दुबळा विरोध

तासगावात राष्टवादीचे नगरसेवक प्रभावहीन : पालिका सभेत दुबळा विरोध

Next

तासगाव : तासगाव शहरात एकापेक्षा एक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत, सत्ताधाऱ्यांकडून भ्रमनिरास होत असताना, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात विरोधक राष्टÑवादीचे नगरसेवकही प्रभावहीन झाले आहेत. सर्वसाधारण सभेत दुबळा विरोध करण्यापलीकडे राष्टÑवादीच्या नगरसेवकांचे दर्शन दुर्मिळ झाल्याचे बोलले जात आहे.

पालिका निवडणुकीत शहरातील जनतेने विरोधक म्हणून राष्टवादीला झुकते माप दिले. राष्टÑवादीच्या आठ नगरसेवकांनी पालिकेत एन्ट्री केली. विरोधक म्हणून राष्टवादीला मिळालेले प्रतिनिधित्व भाजपला झोंबणारे होते. विरोधकांची संख्या जास्त असल्याने सत्ताधाºयांवर अंकुश बसेल अशी अपेक्षा होती. मात्र आतापर्यंतची राष्टवादीची कामगिरी पाहिल्यानंतर, सर्वसारधारण सभेत दुबळा विरोध करण्यापलीकडे राष्टवादीचे नगरसेवक काहीच करू शकलेले नाहीत. सत्ताधाºयांकडून सभा गुंडाळण्याचा पायंडा कायम आहे. हा पायंडा मोडीत काढण्यात विरोधकांना अपयश आले आहे. सभेत एखादा आक्षेप नोंदवण्यापलीकडे राष्टवादीच्या नगरेसवकांची कोणतीच कामगिरी लक्षणीय नाही.

पालिकेकडे कोट्यवधीचा निधी शिल्लक असूनही अनेक महिन्यांपासून एकाही सभेत विकास कामे करण्याचा विषय अजेंड्यावर घेण्यात आला नाही. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा विषय मार्गी लागलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचे गाळेवाटप रखडलेले आहे. शहरातील स्वच्छतेचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरात एक ना अनेक समस्यांचे गाºहाणे असताना, विरोधकांकडून मात्र सक्षमपणे विरोध होताना दिसून येत नाही. सत्ताधाºयांकडून कामे होत नाहीत आणि विरोधकांचा प्रभाव पडत नाही, अशी परस्थिती आहे. त्यामुळे शहरातील जनतेला समस्यांचा सामना करावा लागत आहे.

गतवेळच्या सभागृहात आबा - काका ऐक्य एक्स्प्रेस असताना, काँग्रेसचे अजय पवार हे एकमेव नगरसेवक विरोधी बाकावर होते. त्यावेळी त्यांनी एकट्याने सगळे सभागृह चालवून दाखवले होते. मात्र यावेळी राष्टÑवादीचे आठ नगरसेवक विरोधी बाकावर असतानादेखील, ते नॉट नोटिसेबल ठरत आहेत.

राष्टदीचे नगरसेवक निवडून आलेल्या प्रभागात सत्ताधाºयांपेक्षा अधिक समस्यांचा बोजवारा आहे. गटनेता म्हणून बाळासाहेब सावंत हे एकटेच खिंड लढवताना दिसत आहेत, तर प्रभाग एकमधील निर्मला पाटील याच अपवादाने प्रभागातील समस्यांबाबत आग्रही असल्याचे चित्र आहे. यापलीकडे राष्टवादीच्या नगरसेवकांना कोणताही प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे पालिकेत राष्टवादीची अवस्था असून अडचण आणि नसून खोळंबा अशीच आहे.

सभागृहात भाषण : बाहेर नॉट रिचेबल
प्रभाग एकमधून भाजपचे मातब्बर उमेदवार बाबासाहेब पाटील यांचा पराभव करून राष्टवादीचे अभिजित माळी सभागृहात आले. त्यांच्याकडून लोकांनाही मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र सभागृहात केवळ जुजबी भाषण करण्यापलीकडे माळी यांची कोणतीच कामगिरी लक्षवेधी झाली नाही. किंबहुना बहुतांशीवेळा ते नॉट रिचेबल असल्याने समस्या मांडायच्या तरी कोणाकडे? असा प्रश्न मतदारांना पडला आहे.

Web Title: Nationalist corporators are not affected by the hour: In the municipal meeting weak opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.