Lok Sabha Election 2019 भाजपकडून ‘वंचित’ आघाडीची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 11:42 PM2019-04-21T23:42:38+5:302019-04-21T23:42:56+5:30

जत : धनगर समाजाला भाजपने फसवले आहे. हा फसलेला समाज आपल्याला लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र ...

Lok Sabha Election 2019 BJP's 'deprived' lead generation | Lok Sabha Election 2019 भाजपकडून ‘वंचित’ आघाडीची निर्मिती

Lok Sabha Election 2019 भाजपकडून ‘वंचित’ आघाडीची निर्मिती

googlenewsNext

जत : धनगर समाजाला भाजपने फसवले आहे. हा फसलेला समाज आपल्याला लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतांचे विभाजन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी निर्माण केली आहे. धनगर समाजातील तरुणांनी या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी निवडून येणाऱ्या उमेदवाराला मतदान करणे आवश्यक आहे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ जत शहरातील गांधी चौकात आयोजित सभेत ते बोलत होते.
आ. पाटील म्हणाले की, शेतीमालाला हमीभाव, कर्जमुक्ती, बेरोजगारी, धनगर आरक्षण, यासंदर्भात २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले होते. परंतु मागील पाच वर्षात या आश्वासनांची पूर्तता त्यांनी केली नाही. यासंदर्भात ते काहीच बोलण्यास तयार नाहीत. याशिवाय परत सत्तेवर आल्यानंतर काय करणार आहेत, तेही सांगण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी तयार नाहीत. प्रचार सभांमधून विरोधकांची निंदानालस्ती व स्थानिक नेत्यांवर टीकाटिपणी करण्यातच ते धन्यता मानून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा कमी होत आहे, हे लक्षात आल्यानंतरच भाजपचे लोक देशातील नागरिकांच्या भावना भडकवित आहेत.
आ. पाटील म्हणाले कू, विरोधी उमेदवार खासदार संजय पाटील व गोपीचंद पडळकर एकमेकांवर टीका करण्यात मग्न आहेत. एकमेकांची निंदानालस्ती करत आहेत. परंतु आम्ही गोरगरिबांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. देशाचा विकास व कर्तव्यापलीकडे जाऊन राजकारण केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी महाआघाडीच्या विशाल पाटील यांना मतदान करून विजयी करा.
यावेळी माजी आमदार उमाजी सनमडीकर, रविकांत तुपकर, काँग्रेसचे नेते विक्रम सावंत, सुरेश शिंदे यांचीही भाषणे झाली.
उत्तम चव्हाण, अ‍ॅड. चन्नाप्पा होर्तीकर, इकबाल गवंडी, कुंडलिक दुधाळ, स्वप्नील शिंदे, भूपेंद्र कांबळे, शिवाजी शिंदे, नीलेश बामणे, आप्पासाहेब बिराजदार, रमेश पाटील, महादेव पाटील, मल्लेशी कत्ती, श्रीकांत शिंदे, महादेव कोळी, रमेश पाटील, सुजय शिंदे, संतोष कोळी, तुकाराम माळी उपस्थित होते.

Web Title: Lok Sabha Election 2019 BJP's 'deprived' lead generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.