लोढे तलाव बारमाही करणार -सहा गावांचे शेतकरी एकत्र : बारा लाख भरले; विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 09:51 PM2017-12-18T21:51:32+5:302017-12-18T21:52:12+5:30

मांजर्डे : लोढे तलावामध्ये विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडून तलाव बारमाही करण्यासाठी ६ गावांतील शेतकºयांनी एकत्रित येऊन पाटबंधारे विभागाकडे १२ लाख रुपये जमा

 Lodh Talas will do perennials- Farmers of six villages together: 12 lakhs filled; Will leave the water of Visapur-Punandi scheme | लोढे तलाव बारमाही करणार -सहा गावांचे शेतकरी एकत्र : बारा लाख भरले; विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडणार

लोढे तलाव बारमाही करणार -सहा गावांचे शेतकरी एकत्र : बारा लाख भरले; विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडणार

Next

मांजर्डे : लोढे तलावामध्ये विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडून तलाव बारमाही करण्यासाठी ६ गावांतील शेतकºयांनी एकत्रित येऊन पाटबंधारे विभागाकडे १२ लाख रुपये जमा केले व योजना सुरू झाल्यानंतर उर्वरित रक्कम जमा करण्याचे ठरले.

आरवडे (ता. तासगाव) येथील सिद्धेश्वर मंदिरात लोढे तलाव बारमाही करण्यासाठी पूर्वभागातील गावातील शेतकºयांची बैठक पार पडली होती. बैठकीला आरवडे, डोर्ली, कौलगे, सावर्डे, लोढे या गावांतील शेतकरी उपस्थित होते.

लोढे तलाव तासगाव पूर्व भागातील मोठा तलाव आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता १६३ दशलक्ष घनफूट आहे. या तलावावर या परिसरातील आरवडे, लोढे, कौलगे, सावर्डे, डोर्ली, चिंचणी या गावांच्या शेतीचे व पिण्याच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून आहे. बरीच वर्षे या दुष्काळी पट्ट्यात समाधानकारक पाऊस नसल्याने हा तलाव मागील बरीच वर्षे पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. परिणामी तलावाच्या परिसरातील बागायती शेती उद्ध्वस्त झाली आहे. हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला तर या भागातील शेतीला वर्षभर फायदा होतो. येथून पेयजल योजनेद्वारे पाच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाºया स्वतंत्र पाणीयोजना आहेत. शेतीच्या पाण्यासाठी एकूण १६४ स्वतंत्र पाईपलाइन शेतकºयांनी स्वखर्चाने केल्या आहेत. त्यासाठी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. परंतु त्याचा शेतीसाठी पुरेसा फायदा झाला नाही. मागील २० वर्षांत पावसाच्या पाण्याने दोनवेळा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यामुळे शेतकºयांनी गुंतवलेले कोट्यवधी रुपये वाया गेले आहेत.

चार वर्षांपूर्वी दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रयत्नातून विसापूर-पुणदी उपसा सिंचन पाणीयोजना अस्तित्वात आली. या योजनेतून शासनाच्या माध्यमातून हा तलाव भरला जाईल, अशी शेतकºयांना आशा होती; परंतु या योजनेतून आतापर्यंत या तलावात ४० दशलक्ष घनफूट पाणी केवळ पिण्यासाठी आले आहे. त्यामुळे या भागातील शेतकºयांनी कोणत्याही राजकीय नेत्यावर विसंबून न राहता एकत्रित येऊन शासनाच्या नियमानुसार प्रतिदशलक्ष घनफूट ४२,८०० रुपये भरून हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यायचा, असे या बैठकीत ठरवले. यावेळी प्रति शेतीपंप ३० हजार रुपयाप्रमाणे पैसे जमा करण्यास सर्व शेतकºयांनी होकार दिला व आठ दिवसात सर्वांनी पैसे जमा करून लवकरात लवकर तलाव भरून घ्यायचे सर्वानुमते ठरले.

पंधरा दिवसांत योजना सुरू होणार
पुणदी सिंचन योजनेचे अभियंता एस. एस. रासनकार म्हणाले की, १५ दिवसात पाणीयोजना सुरू होईल व शेतकºयांनी शासन नियमनुसार पैसे भरले, तर तलावात पाणी सोडण्यास काही अडचण येणार नाही. शेतकºयांनी पैसे भरून सहकार्य करावे. आमच्या विभागाकडून सर्वतोपरी आम्ही मदत करू.
 

एकजुटीचे प्रयत्न
राजकारण बाजूला ठेवून लोढे तलाव बारमाही करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. लोढे तलाव बारमाही झाला तरच बागायती शेती जिवंत राहील, अशा प्रतिक्रिया बैठकीत व्यक्त झाल्या.

Web Title:  Lodh Talas will do perennials- Farmers of six villages together: 12 lakhs filled; Will leave the water of Visapur-Punandi scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.