Lok Sabha Election 2019 आघाडीची फटकेबाजी; युतीची ‘टाईट फिल्डिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:41 PM2019-04-12T23:41:45+5:302019-04-12T23:42:02+5:30

प्रताप महाडिक । लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : आघाडी धर्माचे पालन करीत पलूस-कडेगाव मतदारसंघातील काँग्रेस व राष्ट्रवादीने ‘स्वाभिमानी’ची ‘बॅट’ ...

Leading flirtation; Alliance's 'tight fielding' | Lok Sabha Election 2019 आघाडीची फटकेबाजी; युतीची ‘टाईट फिल्डिंग’

Lok Sabha Election 2019 आघाडीची फटकेबाजी; युतीची ‘टाईट फिल्डिंग’

Next

प्रताप महाडिक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : आघाडी धर्माचे पालन करीत पलूस-कडेगाव मतदारसंघातील काँग्रेस व राष्ट्रवादीने ‘स्वाभिमानी’ची ‘बॅट’ हातात घेऊन शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात भाजप-शिवसेनेविरोधात फटकेबाजी सुरू केली आहे, तर भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यासाठी युतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावली आहे.
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत कोणता उमेदवार आघाडी घेणार, यासाठी सुरू असलेली ही लढाई कदम, देशमुख व लाड कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे.
उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच्या कालावधित विशाल पाटील व आमदार विश्वजित कदम यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. परंतु प्रत्यक्ष निवडणूक मैदानात उतरल्यावर विशाल पाटील यांनी कदम यांची कडेगावात जाऊन भेट घेतली आणि त्यांची मनधरणी करण्यात यश मिळविले. कदम यांनीही, माझीच उमेदवारी असे समजून कामाला लागा, असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे. त्यामुळे पलूस-कडेगावातील काँग्रेसचे, कदम यांचे कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.
राष्ट्रवादीही आघाडीधर्म पाळणार आणि विशाल पाटील यांना साथ देणार असे सांगून, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड व जिल्हा परिषदेचे सदस्य शरद लाड यांनीही यंत्रणा कामाला लावली आहे.
दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व संजय पाटील यांच्यात भाजपच्या उमेदवारीवरून चढाओढ होती. मात्र संजयकाका यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यात दिलजमाई झाली. भाजप कार्यकर्ते संजयकाकांच्या प्रचारात उतरले आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी गावोगावी कमी-जास्त प्रमाणात कार्यकर्ते असून, ‘एकच छंद गोपीचंद’ असा नारा ते देत आहेत.

युती । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?
नरेंद्र मोदी यांच्या नावाचा महिमा, जिल्हा परिषद व पलूस आणि कडेगाव पंचायत समितीत भाजपची सत्ता, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा सक्षम व पारदर्शी कारभार ही बलस्थाने भाजपकडे आहेत.
युती । वीक पॉर्इंटस् काय आहेत?
भाजपमधील अंतर्गत संघर्षाचा फटका महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना बसणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीमुळे होणारी मतविभागणी महायुतीसाठी त्रासदायक आहे.
आघाडी । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?
कडेगाव नगरपंचायत, पलूस नगरपरिषद, बहुतांशी ग्रामपंचायतींची सत्ता काँग्रेसकडे आहे. मोहनराव कदम विधानपरिषदेचे, डॉ. विश्वजित कदम विधानसभेचे आमदार आहेत. वसंतदादा घराण्याचा लोकांवर पगडा आहे.
आघाडी । वीक पॉर्इंटस् काय आहेत?
कदम घराणे व दादा घराण्यातील अंतर्गत संघर्षाचा पूर्वानुभव पाहता, विरोधकांना छुपा पाठिंबा. वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर, काँग्रेसचे चिन्ह मतपत्रिकेवर नसल्यामुळे काँग्रेसप्रेमी जनतेतून उमटलेले नाराजीचे सूर.

मागच्या निवडणुकीत़़़
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये डॉ. पतंगराव कदम (काँग्रेस) १,१२,५२३ मते (विजयी), तर पृथ्वीराज देशमुख (भाजप) यांना ८८,४८९ मते मिळाली होती. डॉ. कदम २४ हजार ३४ मतांनी विजयी झाले.

Web Title: Leading flirtation; Alliance's 'tight fielding'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.