बलात्कारप्रकरणी एकास १२ वर्षे सक्तमजुरी : साथीदारालाही कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 09:36 PM2018-03-17T21:36:50+5:302018-03-17T21:36:50+5:30

सांगली : पोलीस असल्याची बतावणी करून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना सक्तमजुरी व ६१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

 Imprisonment for raping a 12-year rigorous imprisonment: The spouse also imprisoned | बलात्कारप्रकरणी एकास १२ वर्षे सक्तमजुरी : साथीदारालाही कारावास

बलात्कारप्रकरणी एकास १२ वर्षे सक्तमजुरी : साथीदारालाही कारावास

Next

सांगली : पोलीस असल्याची बतावणी करून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना सक्तमजुरी व ६१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यातील ४० हजार रुपये पीडित मुलीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. एस. एस. सापटणेकर यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.

विजय मधुकर गुरव (वय २२, रा. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) व रतन दत्ता माने (२०, वडर गल्ली, सांगली) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. विजय गुरव यास १२ वर्षे सक्तमजुरी व विविध कलमांखाली ४३ हजार रुपये दंड, तर रतन मानेला पाच वर्षे सक्तमजुरी व १८ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सरकारतर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील आरती साटविलकर-देशपांडे यांनी काम पाहिले. दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. सांगली-कोल्हापूर जिल्'ात त्यांच्याविरुद्ध खून, चोरी, फसवणूक असे अर्धा डझनहून अधिक गुन्हे नोंद आहेत. दोघांची कारागृहात ओळख झाली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर दोघांनी संयुक्तपणे गुन्हे केले. गुरव हा कुपवाडमध्ये बजरंगनगरमध्ये पारूबाई सावंत यांच्याकडे भाड्याने खोली घेऊन राहत होता. विश्रामबाग येथे पोलीस असल्याचे सांगून त्याने खोली घेतली होती.

पीडित मुलगी कुपवाड परिसरातील आहे. ती नेहमी मोबाईलवर बोलत होती म्हणून १९ फेब्रुवारी २०१४ रोजी वडील तिच्यावर रागावले होते. त्यामुळे रागाच्या भरात ती रात्री घरातून बाहेर पडली. कुपवाड रस्त्यावरील सूतरगिरणीजवळ गेल्यानंतर पाठीमागून गुरव व माने दुचाकीवरुन आले. त्यांनी ‘आम्ही पोलीस आहोत, कुठे जायचे आहे’, अशी विचारणा केली. तिने उपळावी (ता. तासगाव) येथे निघाले आहे, असे सांगितले. दोघांनी तिला ‘रात्र खूप झाली आहे, उद्या सकाळी तुला सोडतो’, असे सांगून गुरवने स्वत:च्या खोलीत नेले. माने घरी निघून गेला. मध्यरात्री गुरवने या मुलीस धाक दाखवून बलात्कार केला. दुसºयादिवशी पीडित मुलगी खोलीतून पळून गेली. घरी जाऊन वडिलांना हा प्रकार सांगितला. कुपवाड पोलीस ठाण्यात गुरवविरुद्ध बलात्कार व अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

मानेविरुद्धही अपहरण व गुरवला मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी याचा तपास केला होता.याचवेळी त्यांच्याकडून कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील वृद्ध रखवालदाराच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आला होता.

आरोपीने न्यायाधिशांवर चप्पल भिरकावली
न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी गुरव याने न केलेल्या गुन्'ाबद्दल मला शिक्षा सुनावली आहे. मी दोषी नाही, असे तो म्हणाला. यावर न्यायाधीशांनी त्याला ‘तू या शिक्षेविरुद्ध अपील करू शकतोस’, असे सांगितले. त्यामुळे गुरव संतापला. त्याने न्यायाधीशांच्यादिशेने चप्पल भिरकावली. अंतर लांब असल्याने चप्पल खिडकीजवळ जाऊन पडली. सांगलीत आरोपीकडून असा पहिलाच प्रकार घडला आहे. न्यायालयाने या घटनेची मुंबई उच्च न्यायालयास माहिती दिली आहे.

 

Web Title:  Imprisonment for raping a 12-year rigorous imprisonment: The spouse also imprisoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.