सांगली जिल्ह्यातील अपघातसंख्येत तब्बल १३ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 07:39 PM2019-05-19T19:39:18+5:302019-05-19T19:39:22+5:30

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वाहनांची वाढती संख्या, खराब रस्ते, वेगावर नसलेले नियंत्रण आणि बेशिस्तपणा अशा ...

Impact of Sangli district: 13 percent increase in accidents | सांगली जिल्ह्यातील अपघातसंख्येत तब्बल १३ टक्क्यांनी वाढ

सांगली जिल्ह्यातील अपघातसंख्येत तब्बल १३ टक्क्यांनी वाढ

Next

अविनाश कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वाहनांची वाढती संख्या, खराब रस्ते, वेगावर नसलेले नियंत्रण आणि बेशिस्तपणा अशा अनेक गोष्टींमुळे जिल्ह्यातील अपघातांची संख्या वाढत आहे. २0१७ च्या तुलनेत २0१८ मध्ये सांगली जिल्ह्यात १३ टक्के अपघात वाढले आहेत. राज्यातील अपघातांच्या वाढीचे प्रमाण 0.८० असताना जिल्ह्याचे हे प्रमाण चिंताजनक आहे.
सांगली जिल्ह्यात एकीकडे वाहनसंख्येत वाढ होत असताना अरुंद व खराब रस्ते, रस्त्यावरील वाहनधारकांचा बेशिस्तपणा, अतिक्रमणे, वेगावर नसलेले नियंत्रण अशा कारणांनी अपघात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरीही त्यात यश मिळताना दिसत नाही.
आकडेवारी अधिकच...
महाराष्टÑ मोटार वाहन विभागाने प्रसिद्ध केलेली ही आकडेवारी जानेवारी ते जून २0१८ पर्यंतची आहे. २0१७ मधील अपघात संख्येशी तिची तुलना केली आहे. अपघात संख्येतील आकडेवारीचा विचार करता कोल्हापूर राज्यात क्रमांक एकवर असून, सांगली राज्यात आठव्या क्रमांकावर आहे. अपघातात मृत्यू होण्याच्या बाबतीत कोल्हापूर क्रमांक एकवर, तर सांगली २२ व्या क्रमांकावर आहे, तर जखमींच्या संख्येतही कोल्हापूर क्रमांक एकवर असून, सांगली ११ व्या क्रमांकावर आहे.

राज्यात २0१७ च्या तुलनेत २0१८ मध्ये एकूण अपघातसंख्येत 0.८० टक्के वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यात ही वाढ १३ टक्क्यांच्या घरात आहे. राज्यात अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत ९.२७ टक्के वाढ झाली असताना जिल्ह्यात ही वाढ ८.६३ टक्के म्हणजे कमी दिसते. दुसरीकडे जखमींच्या आकडेवारीत राज्यात १.६७ टक्के वाढ असताना जिल्ह्यात ही वाढ १0.४0 टक्के दिसते. त्यामुळे अपघातसंख्या कमी होण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे

वाहनसंख्येत होतेय झपाट्याने वाढ
दिवसागणिक वाहनसंख्या वाढत आहे. ३0 एप्रिल २0१९ च्या आकडेवारीनुसार एकूण वाहनसंख्या ९ लाख १५ हजार ६८७ इतकी आहे. ३१ मार्च २०१८ मध्ये ही संख्या ८ लाख ५० हजार ७४८ इतकी होती. म्हणजेच जवळपास एक वर्षात वाहनसंख्येत ६४ हजार ९३९ ची भर पडली. म्हणजेच जिल्ह्यात महिन्याकाठी जवळपास साडेपाच हजार वाहने रस्त्यावर येत आहेत. .

Web Title: Impact of Sangli district: 13 percent increase in accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.