मी सत्तेचा लाचार नाही - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:39 AM2017-08-18T05:39:41+5:302017-08-18T05:39:43+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कोणतीही फूट पडलेली नाही. संघटनेशी ज्यांनी इकडे-तिकडे केले, त्यांची हकालपट्टी झालेली आहे.

I am not helpless to power - Raju Shetty | मी सत्तेचा लाचार नाही - राजू शेट्टी

मी सत्तेचा लाचार नाही - राजू शेट्टी

Next

इस्लामपूर (जि. सांगली) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कोणतीही फूट पडलेली नाही. संघटनेशी ज्यांनी इकडे-तिकडे केले, त्यांची हकालपट्टी झालेली आहे. वाळवा तालुक्यातील शेतकरी माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे कोणीही कोणताही पक्ष काढला तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्याचा फरक पडणार नाही, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता मारला.
येथील शासकीय विश्रामगृहात शेट्टी यांनी वाळवा तालुक्यातील कार्यकर्ते व शेतकºयांची बैठक घेतली. शेट्टी म्हणाले, ‘वाळवा तालुक्यातील माझे कार्यकर्ते लाखमोलाचे आहेत. माझ्या संघटनेत कोणीही इकडे-तिकडे करणार नाही. तालुक्यातील शेतकरी माझ्या पाठीशी आहेत. सत्तेसाठी कोणी तरी लाचार झाले असेल, मात्र, मी सत्तेचा लाचार नाही. अखेरपर्यंत शेतकºयांचे प्रश्न सोडवत राहणार आहे.’

Web Title: I am not helpless to power - Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.