सुटीत विद्यार्थी रमणार पुस्तकांच्या विश्वात-: नगर वाचनालयाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 02:13 PM2019-04-16T14:13:19+5:302019-04-16T14:17:22+5:30

आधुनिक गॅझेट आणि मोबाईलच्या व्हर्च्युअल विश्वात रमणाºया विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी नगर वाचनालयाने विद्यार्थ्यांसाठी खास मोफत बाल विभाग सुरू

The holidays will be held in the books of books: - The city library program | सुटीत विद्यार्थी रमणार पुस्तकांच्या विश्वात-: नगर वाचनालयाचा उपक्रम

सुटीत विद्यार्थी रमणार पुस्तकांच्या विश्वात-: नगर वाचनालयाचा उपक्रम

googlenewsNext
ठळक मुद्दे२५ दिवस हजेरी असणाºयाला मिळणार भेट;वाचनाकडे वळविण्याचा प्रयत्न

सातारा : आधुनिक गॅझेट आणि मोबाईलच्या व्हर्च्युअल विश्वात रमणाºया विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी नगर वाचनालयाने विद्यार्थ्यांसाठी खास मोफत बाल विभाग सुरू केला आहे. सलग २५ दिवस येथे येऊन एक तास पुस्तक वाचणाºया विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात येणार आहे.

येथील प्रतापसिंह नगर वाचनालयाच्यावतीने विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन वाढविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतो. १५ एप्रिल ते ३१ मे या दरम्यान हा उपक्रम सकाळी ८.३० ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत सुरू असणार आहे. 
यांतर्गत वाचनालयातच एक स्वतंत्र जागा या बालकांसाठी उपलब्ध करून दिली जाते. या जागेत विद्यार्थी त्यांच्या आवडीचे पुस्तक घेऊन वाचन करू शकतात. पुस्तक वाचन झाल्यानंतर त्याविषयीचे मत विद्यार्थ्यांनी एका वहीत लिहिणं अपेक्षित 
आहे. येथे येणाºया प्रत्येक विद्यार्थ्याची हजेरीही वाचनालयाच्या वतीने नोंदविण्यात येत आहे. 

या हजेरी पत्रकानुसार २५ दिवस हजेरी लावणाºया विद्यार्थ्याला एका कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. नगर वाचनालयाच्या वतीने पूर्वी शाहूपुरी, नागठाणे, विलासपूर, शेंद्रे, सदरबझार, अजिंक्य कॉलनी आदी ठिकाणी बालक वाचनालयाची उपकेंद्रे सुरू करण्यात आली 
होती. मात्र, या उपक्रेंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्यामुळे ती बंद करण्यात आली. 
वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी वाचनालयाच्या या प्रयत्नांना पालकांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुटीतील ‘एक तास वाचनासाठी’ दिला गेला तर समृद्ध आणि वाचणारी पिढी घडेल, यात शंका नाही. 
 

गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन जवळपास संपुष्टात आले आहे. वाचनालयाकडे येणाºया विद्यार्थ्यांची संख्याही दिवसेंदिवस रोडावत आहे. त्यामुळे बाल वाचनालय विभाग सुरू करण्यात आला. येथे येऊन विद्यार्थ्यांनी किमान एक तास पुस्तक वाचणं अपेक्षित आहे.
- रुपा मुळे,  ग्रंथपाल, नगर वाचनालय

Web Title: The holidays will be held in the books of books: - The city library program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.