सांगलीत मारहाणीचा बदला घेण्यासाठी हमालाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:37 PM2017-11-02T13:37:45+5:302017-11-02T13:47:36+5:30

बुधवारी रात्री झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी सागर सुरेश कराळे (वय ३८, रा. शिवाजी मंडईजवळ, सांगली) याचा लाथाबुक्क्या व चप्पलने मारहाण करुन खून करण्यात आला. आनंद चित्रपटगृहासमोर गुरुवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी रिक्षा चालक अमजद मुजावरसह त्याच्या संपूर्ण कुटूंबावर संशय आहे.

Hamalala's blood for the revenge of Sangli | सांगलीत मारहाणीचा बदला घेण्यासाठी हमालाचा खून

सांगलीत आनंद चित्रपटगृहासमोर गुरुवारी सकाळी खून झाल्यानंतर घटनास्थळी झालेली गर्दी.

googlenewsNext
ठळक मुद्देमारहाणीचा बदला, लाथाबुक्क्या व चप्पलने मारहाण करुन खून रिक्षा चालक अमजद मुजावरसह संपूर्ण कुटूंबावर संशय दारु पिताना किरकोळ कारणावरुन झालेल्या मारहाणीचा बदला घेतल्याचा संशय

सांगली ,दि. ०२ : बुधवारी रात्री झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी सागर सुरेश कराळे (वय ३८, रा. शिवाजी मंडईजवळ, सांगली) याचा लाथाबुक्क्या व चप्पलने मारहाण करुन खून करण्यात आला. आनंद चित्रपटगृहासमोर गुरुवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी रिक्षा चालक अमजद मुजावरसह त्याच्या संपूर्ण कुटूंबावर संशय आहे. घटनेनंतर हे कुटूंब गायब झाले आहे.


सुरेश कराळे हा शिवाजी मंडईत हमालीचे काम करीत होता. त्याला दारुचे व्यसन होते. आनंद चित्रमंदिरजवळील एका दारुच्या दुकानात तो दररोज दारु पिण्यास जात असे. बुधवारी रात्रीही तो दारु पिण्यास गेला होता. तिथे संशयित अमजद मुजावरही आला होता. अमजद हाही शिवाजी मंडईजवळच राहत असल्याने त्याची सुरेशबरोबर चांगली ओळख होती.

दोघांत दारु पिताना किरकोळ कारणावरुन वाद झाला. या वादातून सुरेशने अमजदला श्रीमुखात लगाविली. तेवढ्यात दारु दुकानाजवळील काही लोकांनी मध्यस्थी करुन दोघांची समजूत काढली. दोघेही घरी निघून गेले होते. अमजदने घरी घडलेला प्रकार सांगितला.


गुरुवारी सकाळी अमजद, त्याचा मुलगा अलफास व दोन महिला असे चौघेजण शिवाजी मंडईत रात्री झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यास सुरेशकडे गेले होते. पण तो मंडईत नव्हता. तो दारुच्या दुकानात असल्याचे समजताच चौघेही तिथे गेले. तेवढ्यात सुरेश दुकानातून बाहेर येताच अमजदसह चौघांनी त्याला लाथाबुक्क्या व चप्पने मारहाण केली.

अमजद प्रकृतीने अशक्त असल्याने या मारहाणीत तो गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला. या घटनेनंतर अमजदसह चौघांनी तेथून पलायन केले. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात चौकशी केल्यानंतर अमजद, त्याचा मुलगा व दोन महिलांनी सुरेशचा खून केल्याचे समजले. अमजदच्या घरावर छापा टाकण्यात आला. परंतु घराला कुलूप होते.


सुरेश एकटाच

सुरेश कराळे हा अविवाहित होता. त्याच्या आई, वडिलांचे निधन झाले आहे. तो एकदाच राहत होता. शिवाजी मंडईत हमालीचे काम करुन तो स्वत:च्या उदरनिर्वाह करीत होता. अमजदसह चौघांनी चप्पलने मारहाण केल्याने चप्पलचा व्रण त्याच्या पोटावर उठलेला होता. शरिरात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Hamalala's blood for the revenge of Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.