मुली म्हणतात, शेतीवाला नवरा नको गं बाई! ऐंशी टक्के मुलींकडून नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:45 PM2019-02-17T22:45:45+5:302019-02-17T22:46:23+5:30

राज्यस्तरीय विवाह मेळाव्यांचे आयोजन करणाऱ्या अनेक समाजाच्या प्रमुखांना गेल्या वर्षभरापासून एका धक्कादायक सामाजिक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. शेतीला कमी प्रतिष्ठेचे ठरवून विवाह मेळाव्यांमध्ये ऐंशी टक्क्यांहून अधिक मुलींकडून शेतकरी नवºयास नकार दिला जात आहे.

Girls say, do not have a husband in agriculture! Decline of eighty percent girls | मुली म्हणतात, शेतीवाला नवरा नको गं बाई! ऐंशी टक्के मुलींकडून नकार

मुली म्हणतात, शेतीवाला नवरा नको गं बाई! ऐंशी टक्के मुलींकडून नकार

Next
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातील धक्कादायक वास्तव; जैन, मराठा, माळी समाजाकडून प्रबोधनाची मोहीम हाती

अविनाश कोळी ।
सांगली : राज्यस्तरीय विवाह मेळाव्यांचे आयोजन करणाऱ्या अनेक समाजाच्या प्रमुखांना गेल्या वर्षभरापासून एका धक्कादायक सामाजिक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. शेतीला कमी प्रतिष्ठेचे ठरवून विवाह मेळाव्यांमध्ये ऐंशी टक्क्यांहून अधिक मुलींकडून शेतकरी नवºयास नकार दिला जात आहे. हे प्रमाण वेगाने वाढत असल्याने शेतकरी असलेल्या तरुणांच्या लग्नाला मोठे विघ्न आले आहे. जैन, मराठा समाजामार्फत आता यासाठी प्रबोधनाची मोहीम हाती घेण्यात आली असून, अन्य समाजानेही यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
उच्च शिक्षण घेऊनही नोकरीपेक्षा स्वत:च्या शेतीला प्राधान्य देत अनेक तरुणांनी आर्थिक सक्षमता प्राप्त केली. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणाºया तरुणांची संख्याही कमी नाही. एकीकडे तरुणांकडून शेतीबद्दलची सकारात्मकता वाढीस लागत असताना, विवाहेच्छुक तरुणींमध्ये, त्यांच्या पालकांमध्ये शेती आणि शेतकरी नवरा यांच्याबद्दलची नकारात्मकता वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे शेतकरी मुलांसाठी स्वतंत्र विवाह मेळावे घेण्याची वेळ अनेक समाजांवर आली आहे. जैन समाजामार्फत गेल्या वर्षभरापासून यासाठी प्रयत्न सुरू आहेत. युवती सक्षमीकरण मेळावे घेऊन शेतकरी मुलांविषयी सकारात्मक प्रबोधन केले जात आहे. त्याला यश मिळत असले तरी, त्याची टक्केवारी आजही चिंताजनक आहे.
जैन समाजाने गतवर्षी घेतलेल्या शेतकरी वधू-वर मेळाव्यात ८०० मुलांची नोंदणी झाली. शेतकरी मुलगा वर म्हणून पसंत असल्याचे सांगून नोंदणी केलेल्या मुलींची संख्या तीनशेच्या घरात होती. तरीही अल्पभूधारक शेतकºयांना पुन्हा नापसंती दर्शविली गेली. ३३ शेतकरी मुलांचे विवाह या मेळाव्यात निश्चित झाले. त्यामुळे उर्वरीत जवळपास साडेसातशे मुलांना पुन्हा प्रतीक्षेत रहावे लागले. दरवर्षी ही संख्या वाढत आहे. सांगलीच्या मराठा समाजानेही पुढील महिन्यात अशाप्रकारचा शेतकरी मुलांसाठीचा मेळावा आयोजित केला आहे. ही समस्या केवळ जिल्ह्यापुरती मर्यादीत नसून, राज्यस्तरीय मेळाव्यांमध्ये असाच अनुभव येत आहे.
विविध समाजांचे राज्याचे नेतृत्व करणारे लोक सांगलीत आहेत. त्यांनी मेळाव्यांमधून घेतलेला हा अनुभव धक्कादायक असल्याने त्यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. ही परिस्थिती बदलली नाही, तर शेतीशी संबंधित अनेक कुटुंबांमध्ये विवाहाचे प्रसंग अपवादाने घडतील. शेतीला विवाहाच्या व्यासपीठावर सर्वात कमी प्रतिष्ठेचे बनविले गेले आहे. त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनत असल्याचे दिसून येत आहे.

भावी वराबद्दल : या आहेत अपेक्षा
विवाह मेळाव्यात तरुणी भावी वराकडून ज्या अपेक्षा व्यक्त करीत आहेत, त्यामध्ये सर्वात मोठे स्थान सरकारी नोकरीला असून, त्याखालोखाल मोठ्या शहरातील मोठ्या पगाराच्या नोकरीला आहे. अपेक्षांच्या यादीत सर्वात शेवटचे स्थान हे शेतकºयाला आहे. शेतकरी नवºयासह, शेतीत काम करणेसुद्धा कमी प्रतिष्ठेचे मानले जात आहे. अल्पभूधारक शेतकºयांना तर विवाहाच्या व्यासपीठावर अत्यंत दुर्लक्षित केले जात आहे. स्वत:चे घर, चांगली नोकरी, छोटे कुटुंब आणि शेती असेल तर चांगलेच, असे सांगताना, संबंधित मुलीला शेतात पूर्णवेळ काम करणारा नवरा नको आहे. हाच सर्वांसमोर चिंतेचा विषय बनला आहे. बºयाच समाजात शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने त्यांच्यातील तरुणांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

गेल्या काही वर्षांपासून आम्हाला हा प्रश्न सतावत आहे. मुलींसह त्यांच्या पालकांच्या प्रबोधनाची मोहीम आम्ही हाती घेतली आहे. शेतकरी नवरा नको म्हणणाºया मुलींची संख्या जवळपास ८५ ते ९० टक्के आहे. त्यामुळे आतापासून आम्ही मोहीम सुरू केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- शशिकांत राजोबा, वीरसेवा दल, सांगली

सांगली जिल्ह्यासह राज्यभरात आम्हाला शेतकरी मुलांबाबतची नकारात्मकता जाणवत आहे. त्यामुळे पुढील महिन्यात आम्ही केवळ शेतकरी मुलांसाठी वधू-वर मेळावा आयोजित करणार आहोत. विवाह मेळाव्यात येणाºया जवळपास ९० टक्के तरुणी शेतकरी नवरा नको म्हणत असल्याचे दिसत आहे. हे प्रमाण चिंताजनक आहे. शेतीला इतकी कमी प्रतिष्ठा दर्शविणे चुकीचे आहे.
- ए. डी. पाटील, संचालक, मराठा समाज संस्था

आम्ही अनेक राज्यस्तरीय मेळावे घेतले. ६० ते ६५ टक्क्यांहून अधिक तरुणींनी शेतकरी असलेल्या मुलांना नाकारले. त्यामुळे ही समस्या माळी समाजालाही भेडसावत आहे. मुलींकडील व्यावसायिक अपेक्षांच्या यादीत सर्वात शेवटी शेतकरी आहे. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.
- विजयराव धुळूबुळू, अध्यक्ष, अखिल भारतीय माळी समाजोन्नती परिषद

Web Title: Girls say, do not have a husband in agriculture! Decline of eighty percent girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.